Advertisement

आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचे नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार आता ग्राहक इतक्या दिवसात मोबाईल नंबर पोर्ट करू शकतात.

आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम
SHARES

मोबाइल नंबर पोर्ट करण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी झाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचे नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार आता ग्राहक 3 दिवसांत आपला नंबर पोर्ट करू शकतो.


मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे?

तुम्हाला जर एका मोबाइल कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या मोबाइल कंपनीची सेवा घ्यायची असेल तर मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा उपयोग होतो. कंपनी बदलली तरी तुमचा मोबाइल नंबर मात्र तोच ठेवता येतो. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी लागतो. आता हाच अवधी 3 दिवसांचा असेल. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये यूजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागतो. या यूनिक कोडमुळे नंबर पोर्ट करता येतो.


ट्रॅन्जॅक्शन फी वाढली

१६ डिसेंबरपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. टेलिकॉम ऑपरेटर्सना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ट्रॅन्जॅक्शनसाठी पैसे भरावे लागतात. ट्रायनं ठरवलेली नवी फी आता ५.७४ रुपये झालीय. सध्या प्रत्येक ग्राहकासाठी टेलिकॉम ऑपरेटरला १९ रुपये द्यावे लागतात



हेही वाचा

बंद मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना ट्रायचे निर्देश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा