Advertisement

बंद मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना ट्रायचे निर्देश

बंद मोबाइल क्रमांक संकेतस्थळावर जाहीर केल्यास हे नंबर कंपन्यांना त्वरित कळतील. अनेक कंपन्या, बँका, विमा कंपन्यांमध्ये ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदवण्यात येतो.

बंद मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना ट्रायचे निर्देश
SHARES

कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी आता दर महिन्याला दूरसंचार कंपन्यांना द्यावी लागणार आहे. बंद मोबाइल क्रमांकाची यादी  दर महिन्याला संकेतस्थळावर जाहीर करावी, असे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. 

बंद मोबाइल क्रमांक संकेतस्थळावर जाहीर केल्यास हे नंबर कंपन्यांना त्वरित कळतील. अनेक कंपन्या, बँका, विमा कंपन्यांमध्ये ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदवण्यात येतो. या मोबाइल क्रमांकावरा कोणतीही सेवा घेताना वन टाईम पासवर्ड पाठवला जातो. मात्र, अनेकवेळा हा नंबर बंद असतो. याची माहिती बँक, विमा कंपन्या यांना नसते. त्यामुळे या नंबरवर सर्व माहिती पाठवली जाते.  यामध्ये कंपन्यांची फसवणूक होण्याची भीती असते. हे प्रकार गेले अनेक महिने सुरू असल्याचे ट्रायच्या निदर्शनास आले होते.

असे प्रकार रोखण्यासाठी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. दूरसंचार कंपन्यांनी बंद झालेले नंबर संकेतस्थळावर टाकल्यास संबंधित कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांचा क्रमांक बंद झाला असल्यास त्याची माहिती मिळेल.  जर ग्राहकांनी कंपन्यांमध्ये बदललेला क्रमांक नोंदवला नाही तर अशावेळी ग्राहकांचा जुना मोबाइल क्रमांक बंद झाल्याची माहिती मिळाल्यावर संबंधितांशी संपर्क साधून नवीन क्रमांक नोंदवण्यासाठी सांगता येईल.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा