Advertisement

भारतात प्रथमच PIP जॉइंट रिप्लेसमेंट ऑपरेशन यशस्वी

गंभीर दुखापतीनंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअर पुन्हा कामावर रुजू झाला.

भारतात प्रथमच PIP जॉइंट रिप्लेसमेंट ऑपरेशन यशस्वी
SHARES

भारतात प्रथमच मुंबईतील परळ येथील Gleneagles Hospitalच्या Hand Surgery टीमने PIP Joint Replacementची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. KLS Martin CAP-FLEX Joint Replacement Systemच्या मदतीने ही प्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेमुळे कल्याण येथे राहणाऱ्या 40 वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनिअर संदीप सोनावणे यांना गंभीर दुखापतीनंतर हाताची कार्यक्षमता पुन्हा मिळवण्यास मदत झाली आहे.

संदीप यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. बोटातील Proximal Interphalangeal म्हणजेच PIP Joint अनेक फ्रॅक्चरमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. उपचार आणि जवळपास तीन महिने थेरपी घेऊनही बोट चुकीच्या स्थितीत जुळल्याने त्यांना तीव्र स्टिफनेस, वेदना आणि हालचालींवर मर्यादा जाणवत होती.

इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून संदीप यांच्या कामासाठी हाताचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बोटाची हालचाल कमी झाल्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर आणि स्वावलंबनावर झाला होता.

स्थानिक उपचारांनंतरही अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना Gleneagles Hospital, Parel येथील Hand Reconstructive आणि Brachial Plexus Surgeon तसेच AURA Hand Surgery Unitचे प्रमुख डॉ. कुशल शाह यांच्याकडे पाठवण्यात आले.

डॉक्टरांनी हाडांची स्थिती, सांध्याचे नुकसान, स्थिरता, टेंडनचे कार्य आणि रुग्णाच्या व्यावसायिक गरजा यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर KLS Martin CAP-FLEX Systemच्या सहाय्याने PIP Joint Replacement करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. कुशल शाह यांच्या म्हणण्यानुसार, या शस्त्रक्रियेचा उद्देश केवळ बोटाची विकृती दुरुस्त करणे नव्हता, तर बोटाला स्थिरता देऊन हाताची उपयुक्त हालचाल आणि कार्यक्षमता पुन्हा मिळवणे हा होता.

PIP Joint हा हाताच्या दैनंदिन हालचालींसाठी महत्त्वाचा असतो. बोट वाकवणे, मूठ बंद करणे, वस्तू पकडणे आणि अचूक हालचाली करण्यासाठी या सांध्याची भूमिका महत्त्वाची असते.

मात्र PIP Joint Replacement प्रत्येक रुग्णासाठी योग्य उपचार नाही. रुग्णाचे वय, व्यवसाय, सांध्याचे नुकसान, हाडांची गुणवत्ता, टेंडनचे कार्य, सांध्याची स्थिरता आणि अपेक्षा यांचा विचार करूनच हा पर्याय निवडला जातो.

तीन महिन्यांनंतर पुन्हा कामावर

शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांच्या फॉलोअपमध्ये संदीप यांच्या बोटाच्या हालचालींमध्ये उत्साहवर्धक सुधारणा दिसून आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते पुन्हा आपल्या व्यावसायिक कामात सहभागी होऊ शकले.

संदीप यांनी सांगितले की, दुखापतीनंतर पुन्हा हाताचा सामान्यपणे वापर करता येईल की नाही, याची त्यांना चिंता होती. बोटाची हालचाल पुन्हा मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन परत मिळण्यास मदत झाली.

Gleneagles Hospital Mumbaiचे CEO डॉ. बिपिन चेवाळे यांनी सांगितले की, हाताची पुनर्रचना म्हणजे केवळ हालचाल सुधारण्यापुरती मर्यादित नसून, रुग्णाला त्याच्या दैनंदिन आणि व्यावसायिक आयुष्यात आवश्यक असलेली कामे पुन्हा करता यावीत, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

या केंद्रातील पहिल्या PIP Joint Replacementमुळे जटिल हाताच्या दुखापतींवरील उपचारांच्या नव्या शक्यता समोर आल्या आहेत.



हेही वाचा

महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश आणखी कठीण होणार?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा