केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार ५५५० कोटी

अमेरिकन फर्म केकेआर अँड कं. रिलायन्स समूहाच्या रिलायन्स रिटेलमध्ये ५५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. केकेआर रिलायन्स रिटेलमधील १.२८ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स रिटेलचे भारतातील ७००० शहरांमध्ये १२ हजारांपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. 

मागील आठवड्यात कार्लाइल ग्रुपने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याआधी अमेरिकेतील प्रायवेट इक्विटी फर्म सिल्वर लेकने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.

केकेआरची रिलायन्स समूहामध्ये असणारी ही दुसरी गुंतवणूक आहे. मे २०२० मध्ये केकेआरने डिजिटल सेवा पुरवणाऱ्या रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११,३६७ कोटींची गुंतवणूक केली होती.

रिलायन्स समूह अॅमेझॉन इंडिया आणि वॉलमार्टच्या मालकीचे असणाऱ्या फ्लिपकार्टशी स्पर्धा करण्यासाठी जगभरातील महत्त्वाच्या कंपन्यांशी करार करत आहे. तेल कंपन्या ते अगदी टेलिकॉम, आरआयएल त्यांच्या रिटेल बिझनेसचा विस्तार करत आहे. या स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेलच ग्लोबल गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.


हेही वाचा -

कार्लाइल ग्रुप रिलायन्स रिटेलमध्ये करणार १५ हजार कोटींची गुंतवणूक

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक


पुढील बातमी
इतर बातम्या