Advertisement

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक

अमेरिकेतील प्रायवेट इक्विटी फर्म सिल्वर लेकने रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक
SHARES

अमेरिकेतील प्रायवेट इक्विटी फर्म सिल्वर लेकने रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमध्ये ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या बदल्यात सिल्वर लेकला रिलायंस रिटेलमध्ये १.७५ टक्के भागीदारी मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यापूर्वी सिल्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २.०८ टक्के भागीदारी खरेदी केली होती.

या कराराबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी म्हणाले की, सिल्वर लेकसोबत झालेल्या पार्टनरशिपमुळे मला खूप आनंद होत आहे. यातून लाखो लोकांसोबतच लहान व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. सिल्वर लेकची ही गुंतवणूक रिलायन्स रिटेलच्या ४.२१ लाख कोटींच्या किंमतीच्या आधारे केली जात आहे. मुकेश अंबानी आपल्या रिलायंस रिटेलमधील १० टक्के  भाग विकण्याच्या विचारात आहेत. ही विक्री नवीन शेअर्सच्या रुपात केली जाईल. 

 मुकेश अंबानी भारतात रिटेल व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. मुकेश अंबानी या विस्तारासाठी संभाव्य गुंतवणूकदार शोधत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड फ्यूचर समूहाचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय तसेच, लॉजिस्टीक्स अँड वेअरहाउसिंग व्यवसाय घेणार आहे. यातून रिलायंस, फ्यूचर ग्रुपचा बिग बाजार, ईजीडे आणि एफबीबीचे १८०० पेक्षा जास्त स्टोर्सपर्यंत पोहचेल. हा करार २४७१३ कोटी रुपयांचा आहे.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement