जर तुमच्याकडे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India - lic) ची पाॅलिसी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. एलआयसी १ फेब्रुवारीपासून आपल्या २३ पॉलिसी बंद करणार आहे. विमा नियामक आयआरडीएआय (IRDAI) ने जीवन विमा उत्पादनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांचे पालन करण्यासाठी एलआयसी आपल्या जुन्या पाॅलिसी (policy) बंद करणार आहे.
जुन्या पॉलिसीच्या वैधतेमध्ये किंवा त्याच्या पॉलिसी लाभामध्ये कोणताही बदल होणार नाही. एलआयसीने (lic) बंद केलेल्या पाॅलिसीमध्ये जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ या लोकप्रिय पाॅलिसींचा समावेश आहे. विमा नियामकाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी ग्राहकांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करेल, असं एलआयसीने म्हटलं आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority of India) जीवन विमा कंपन्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या योजना त्यामध्ये बसत नाहीत त्या बंद करण्याचे आदेश दिले होते. पाॅलिसी बंद करण्यासाठी कंपन्यांना ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदत दिली होती. मात्र, ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या पॉलिसींमध्ये बदल किंवा पुन्हा परवानगी मिळविण्यासाठी कंपन्यांना २९ फेब्रुवारी २०२० ची मुदत देण्यात आली आहे.
एलआयसी काही पाॅलिसी पुन्हा सुरू करू शकते. मात्र, या नवीन पाॅलिसीवरील रिटर्न्सच कमी होण्याची तसंच त्यांचे प्रीमियम (Premium) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलआयसी (lic) एजंट ग्राहकांना ३१ जानेवारीपूर्वी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
ह्या पाॅलिसी होणार बंद
हेही वाचा -