Advertisement

३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांचा संप

भारतीय बँक असोसिएशनशी (Bank association of india) वेतनासंबंधी चर्चा अयशस्वी झाल्याने बँक संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप (strike) पुकारला आहे. तर एप्रिलपासून बेमुदत संपही जाहीर करण्यात आला आहे.

३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांचा संप
SHARES

भारतीय बँक असोसिएशनशी (Bank association of india) वेतनासंबंधी चर्चा अयशस्वी झाल्याने बँक संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप (strike) पुकारला आहे. तर एप्रिलपासून बेमुदत संपही जाहीर करण्यात आला आहे. वेतन करार अयशस्वी झाल्याने बँक युनियनने संप जाहीर केला आहे.  इतकेच नाही तर ११, १२ आणि १३ मार्च रोजी सलग तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. याशिवाय मार्चमध्ये होळी व इतर सुट्टीसह आठ दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे.

बँक संघटनांनी (bank union) ने जारी केलेल्या माहितीनुसार, मागण्या मान्य न झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना (Bank employee) १ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्यास भाग पडेल. ८ जानेवारी रोजीही बँका संपावर होत्या. नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ दहा केंद्रीय कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी भारत बंदची घोषणा केली होती. आर्थिक सर्वेक्षण ३१ जानेवारीला संसदेत सादर केले जाईल. तर १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपले दुसरे बजेट सादर करतील. याच कालावधीत भारतीय बँक संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्याने संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

८ जानेवारी रोजी भारत बंदबरोबर जवळपास ६ बँक संघटना (bank union) संपावर गेल्या होत्या. बहुतेक बँका त्या दिवशी बंद ठेवल्या गेल्या. बँक कर्मचाऱ्यांचा आता महिन्यातील हा दुसरा संप असेल. १ फेब्रुवारी हा महिन्याचा पहिला शनिवार आहे. शेअर बाजारांनीही या दिवशी बाजार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सरकारी बँकांचं कामकाज सलग ३ दिवस बंद राहील. विशेष म्हणजे, १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प असून त्याच दिवशी सरकारी बँकांचं कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.   

वेतनवाढीचा प्रश्न न सुटल्यास या दोनदिवसीय संपानंतर ११ ते १३ मार्चदरम्यानही देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. तसंच १ एप्रिलपासून बेमुदत संप केला जाणार आहे. १४ व १५ मार्चला दुसरा शनिवार व रविवार असल्याने बँकांचे कामकाज सलग ५ दिवस बंद राहील.

काय आहेत मागण्या?

  • २० टक्के वेतनवाढीची मागणी
  • असोसिएशनकडून १२.२५ टक्के पगारवाढीस अनुकूलता 
  • सर्व सरकारी बँकांत ५ दिवसांचा आठवडा व्हावा
  • बँक कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित 
  • २०१२ ते २०१७ या कालावधीसाठी बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ मिळाली होती



हेही वाचा -

डेबिट, क्रेडिट कार्डवर मिळणार ‘ही' विशेष सुविधा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा