डेबिट, क्रेडिट कार्डवर मिळणार ‘ही' विशेष सुविधा

आपले क्रेडिट कार्ड (credit card) आणि डेबिट कार्ड (debit card) आता अधिक सुरक्षित होणार आहे. जर क्रेडिट आणि डेबिट कार्ड आपल्याला वापरायचं नसेल तर ते आता स्विच आॅफ (switch off) करता येणार आहे. तर कार्ड वापरायचं असेल तर ते स्विच आॅन (switch on) करता येईल.

SHARE

 आपले क्रेडिट कार्ड (credit card) आणि डेबिट कार्ड (debit card) आता अधिक सुरक्षित होणार आहे. जर क्रेडिट आणि डेबिट कार्ड आपल्याला वापरायचं नसेल तर ते आता स्विच आॅफ (switch off) करता येणार आहे. तर कार्ड वापरायचं असेल तर ते स्विच आॅन (switch on) करता येणार आहे. या सुविधेमुळे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तरी ते इतरांना वापरता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (rbi) ने सर्व बँक आणि इतर कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट किंवा व्हर्च्युअल कार्ड स्वत: बंद करण्याची आणि चालू करण्याची (स्विच ऑन आणि स्विच ऑफ) सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे.

 रिझर्व्ह बँकेच्या या निर्देशामुळे डेबिट कार्ड (debit card) किंवा क्रेडिट कार्ड (credit card) धारकांना हवे तेव्हा आपले कार्ड स्विच ऑन (switch on) आणि स्विच ऑफ (switch off) करता येणार आहे. ग्राहकांना या सुविधेचा वापर मोबाइल अॅप (mobile app), इंटरनेट बँकिंग (internet banking), एटीएम मशीन या माध्यमांतूनच करता येणार आहे. या सुविधेमुळे कार्डद्वारे होणारे व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. 

मागील काही वर्षांमध्ये डेबिट कार्ड  (debit card) आणि क्रेडिट कार्ड (credit card) द्वारे व्यवहाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. कार्डद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित व्हावेत यासाठीच आरबीआयकडून हे पाऊल उचललं गेलं आहे. ज्या कार्डद्वारे आतापर्यंत ऑनलाईन व्यवहार झालेले नाहीत, त्यांचा ऑनलाईन वापर बंद करावा असंही आरबीआयनं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल हे नवे नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्डसारख्या इतर कार्डसाठी लागू असणार नाही.  

सध्या अनेक बँका मोबाइल अ‍ॅप्सवर ही सुविधा देत आहेत. अॅपमध्ये स्विच ऑफ (switch off) आणि स्विच आॅन (switch on)करण्याचा पर्याय आहे. कार्ड वापरल्यानंतर ते मोबाईल अ‍ॅपवर जाऊन बंद केले जाऊ शकते. ज्यानंतर ते कार्ड निष्क्रिय होते. त्याच वेळी कार्ड वापरताना ते चालू केले जाऊ शकते. त्यानंतर कार्ड सक्रिय केले जाते. हेही वाचा -

रतन टाटांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

PMC Scam : वाधवा पितापुत्राची कोठडी कायम, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती
संबंधित विषय
ताज्या बातम्या