रतन टाटांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये आयोजत इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस) च्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

SHARE

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये आयोजत इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस) च्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. त्यांनी अनेक दूरदर्शी पाऊलं उचलली आहेत. आपल्याला गर्व वाटावा अशा दूरदर्शी सरकारची मदत केली पाहिजे’, असं रतन टाटा म्हणाले.

हेही वाचा- PMC Scam : वाधवा पितापुत्राची कोठडी कायम, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

भारत एका नव्या भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील तरुणांना पुढं जाण्यासाठी पुरेशा संधीची गरज आहे. पण जेव्हा त्यांच्यात कौशल्य निर्माण होईल, तेव्हाच त्यांना या संधी मिळतील. तरुणांच्या कौशल्याविना देशाची प्रगती होऊ शकणार नाही. त्यासाठी एका ध्येयाने बनवण्यात येणाऱ्या ‘आयआयएस’ सारख्या महत्त्वाच्या ठरू शकतात. हे ध्येय आणि व्हिजन मोदी सरकारकडे आहे. मी २० वर्षांचा असतो, तर या कामात आणखी जास्त क्षमतेने सहभाग घेतला असता, असं टाटा म्हणाले. 

कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे या संस्थेची निर्मिती केली जात आहे. तरुणांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण बनवणं हा या संस्थेचा उद्देश आहे. गांधीनगरमध्ये ‘आयआयएस’ची स्थापना करण्यासाठी टाटा ग्रुपने केंद्र सरकारसोबत भागीदारी केली आहे. शहरातील २० एकर परिसरात ‘आयआयएस’ उभारण्याचं  काम सुरू करण्यात आलं आहे. याआधी कानपूरमध्ये २०१६ मध्ये आणि मुंबईत २०१९ मध्ये आयआयएसचं भूमीपूजन करण्यात आलं होतं.  

हेही वाचा- बँक कर्मचारी पुन्हा संपावर?

संबंधित विषय
ताज्या बातम्या