SHARE

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास  ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला संपावर जाण्याचा इशारा युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (यूएफबीयू) या संघटनेने दिला आहे. यूएफबीयू ही ९ कर्मचारी संघटनांची शिखर संघटना आहे.

इंडियन बँक्स असोसिएशनसोबत १३ जानेवारीला वेतनवाढीसंबंधी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने दोनदिवसीय संपाचा निर्णय घेतल्याचं यूएफबीयूने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे. कर्मचारी संघटना या संपावर ठाम राहिल्यास २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सरकारी बँकांचं कामकाज सलग ३ दिवस बंद राहील. विशेष म्हणजे, १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प असून त्याच दिवशी सरकारी बँकांचं कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.  

काय आहेत समस्या?

  • २० टक्के वेतनवाढीची मागणी
  • असोसिएशनकडून १२.२५ टक्के पगारवाढीस अनुकूलता 
  • सर्व सरकारी बँकांत ५ दिवसांचा आठवडा व्हावा
  • बँक कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणी नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित 
  • २०१२ ते २०१७ या कालावधीसाठी बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ मिळाली होती

वेतनवाढीचा प्रश्न न सुटल्यास या दोनदिवसीय संपानंतर ११ ते १३ मार्चदरम्यानही देशव्यापी संप पुकारण्यात येईल. तसंच १ एप्रिलपासून बेमुदत संप केला जाईल, असा इशारा यूएफबीयूचे निमंत्रक सिद्धार्थ खान यांनी दिला. १४ व १५ मार्चला दुसरा शनिवार व रविवार असल्याने बँकांचे कामकाज सलग ५ दिवस बंद राहील.


हेही वाचा- PMC Scam: ‘एचडीआयएल’ची संपत्ती विकण्यास मंजुरी

महागडा प्रवास, चर्चगेट ते प्रभादेवी प्रवासासाठी उबरचं बिल ४ लाख

संबंधित विषय
ताज्या बातम्या