महागडा प्रवास, चर्चगेट ते प्रभादेवी प्रवासासाठी उबरचं बिल ४ लाख

चर्चगेट ते प्रभादेवी या १० किलोमीटरच्या अंतरासाठी ४ लाख ७ हजार ७८१चं बिल... पण इतकं बिल आलं कसं? वाचा सविस्तर...

SHARE

प्रवासासाठी सोईस्कर म्हणून उबरनं प्रवास करण्याकडे मुंबईकरांचा जास्त कल दिसून येतो. अंतर जवळ असो वा लांब बरेच जण उबेरचा वापर करतात. एसीमध्ये बसून आरामात प्रवास करता येतो. किंमत देखील काळी-पिवळी टॅक्सी एवढीच असते. त्यामुळे काळी-पिवळी टॅक्सी एवजी प्रवासी उबरचाच पर्याय निवडतात. पण मुंबईतल्या एका प्रवाशाला एक विचित्र पण मजेशीर अनुभव आला आहे.

४ लाखाचा प्रवास

चर्चगेटहून प्रभादेवीला जाण्यासाठी तेजस शाहला उबर बुक करायची होती. त्यासाठी त्यानं लोकेशन टाकले. पण किंमत पाहून त्याला धक्काच बसला. चर्चगेट ते प्रभादेवी या १० किलोमीटरच्या अंतरासाठी किती पैसे लागले असतील? अंदाज लावा बघू... ५०० ट्राफिक असेल तर ८०० अगदीच काय तर १००० एवढेच लागले असतील, असा तुमचा अंदाज असेल.


टॅक्सीवर लागणार तीनरंगी दिवे, १ फेब्रुवारीपासून होणार अंमलबजावणी


तुम्ही दिलेलं उत्तर चुकिचं आहे. खरी किंमत ऐकून तेजससारखा धक्का तुम्हाला देखील बसेल. तर चर्चगेट ते प्रभादेवी या १० किलोमीटरच्या अंतरासाठी तेजसला ४ लाख ७ हजार, ७८१ रुपये दाखवले. मजेशीर म्हणजे वॅगन आरची जवळपास एक्स-शोरूममध्ये इतकी किंमत आहे. तेजसनं ट्विटरवर त्याचा हा मजेशीर अनुभव शेअर केला.

उबरची विनंती

तेजसनं ट्विटरवर आपला अनुभव शेअर केला. शिवाय उबरला टॅग देखील केले. उबरनं देखील त्याला प्रतिक्रिया दिली. उबरनं उत्तर दिले की, "कदाचित तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार झाला असेल. तुम्ही ही कॅब कॅन्सल करून दुसरी कॅब बुक करण्याचा प्रयत्न करा."

लोकल मुंबईची लाईफलाईन असली तरी लोकसंख्येचा एक मोठा भाग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॅबवर अवलंबून असतो. कॅबचा वापर दक्षिण मुंबईत जास्त होतो. कारण या भागात ऑटो चालवण्यास परवानगी नाही. काळी-पिवळी सोडली तर ओला आणि उबर प्रवाशांना अधिक सोयीस्कर पडते. शिवाय काळी-पिवळी टॅक्सी आणि ओला-उबरच्या किंमतींमध्ये देखील जास्त फरक नसतो. पण तेजसला आलेला अनुभव पाहता कधी काही होईल याचा काही हिशोब नाहीहेही वाचा

सुरक्षित प्रवासासाठी उबेरचे ३ नवे फिचर्स

सैन्य आणि पोलिसांच्या गाड्यांना फास्टॅग बंधनकारक

संबंधित विषय
ताज्या बातम्या