घरबसल्या विकत घेता येणार महिंद्राच्या गाड्या

लॉकडाऊनमध्येही महिंद्राची वाहनं आता घरबसल्या विकत घेता येणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने शुक्रवारी एक ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या  आॅनलाइन विक्री प्लॅटफॉर्ममध्ये ग्राहकांना वाहन खरेदी करता येणार आहे. .ओन-ऑनलाईन'(Own-Online) या नवीन उपक्रमांतर्गत कार कर्जे, विमा, नवीन कार, कार उपकरणे आणि जुन्या कार खरेदीसंदर्भात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 

चार सोप्या स्टेप्सद्वारे घरी बसून कार खरेदी करता येणार आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नकरा म्हणाले की, ‘कार खरेदी करण्यापूर्वी आणि नंतरच्या प्रक्रियेसाठी कंपनी आधीपासूनच ऑनलाइन माहिती देत आहे. परंतु आता त्यासंदर्भातील इतर सुविधाही ऑनलाइन केल्या गेल्या आहेत. आजकाल सर्व प्रकारात ऑनलाइन कार खरेदी करण्यास जास्त पसंती देण्यात आली आहे. त्यानुसार, महिंद्र कंपनी या वाहनांच्या किरकोळ बाजारात होत असलेल्या बदलांसाठी सज्ज आहे.

कंपनीने आपल्या या नव्या अभियानामध्ये देशभरात 270 हून अधिक डीलर्स आणि 900 हून अधिक विक्री केंद्रे समाविष्ट केली आहेत. सर्व डीलर कमीत कमी मानवी संपर्क ठेवण्यासह, स्वच्छतेचे नियमही काटेकोरपणे पाळत आहेत. टेस्ट ड्राइव्हस्, कागदपत्रांचे संग्रहण आणि वाहन वितरण यामध्येही स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, जुन्या कारची देवाणघेवाण करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना, त्यांच्या जुन्या कारचे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने इन्स्टंट, रिअल-टाइम ऑनलाइन कोटेशन देण्यात आले आहे. अशा प्रकारे महिंद्र ऑनलाईन आपल्या गाड्या विकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, याआधी देशातील प्रीमियम कारची आघाडीची कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) नेही ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली आहे.


हेही वाचा -

धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक

 

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 13 हजार 758 जणांवर पोलिसांनी नोंदवले गुन्हे


पुढील बातमी
इतर बातम्या