धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक


धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक
SHARES
मुंबईत सध्या लाँकडाऊनमुळे नवरा बायकोच्या घरगुती भांडणात वाढ झाली आहे. नागपाडा येथे अशाच एका क्षुल्लक कारणांवरून नवरा बायकोचं भांडण विकोपाला गेल्याने नवऱ्याने  पत्नीला तोंडी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विरोधात महिलेने नागपाडा पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी पतीविरुद्ध् मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2017 अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन त्याचाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका मुस्लिम तरुणीचा विवाह 2015मध्ये नागपाड्यातील बेलासिस रोड या ठिकाणी राहणा-या तरुणासोबत झाला. या दाम्पत्याला अडीच वर्षाचा मुलगा आहे. या विवाहितेच्या तक्रारीनुसार 2018 मध्ये मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध् नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात महिन्यांनी पतीने नातेवाइकांसमोर माफी मागितली होती. त्यानंतर हे दोघे दाम्पत्य एकत्र आले आणि दोघांचा सुखीसंसार सुरू होता. अशातच पत्नीने पतीला मुलासाठी दुकानातून डायपर आणण्यासाठी सांगितले, परंतु पतीने हे माझे काम नाही, असे सांगून डायपर आणण्यास नकार दिला.

यावरून दोघात वाद सुरु झाले. लहान मुलांचे काम तुझ्याकडून होत नाही का, तुझ्या भावाकडून डायपर घेऊन ये, मी आणणार नाही, अशा शब्दात पतीने पत्नीला नकार दिला. त्यानंतर वादातून संपापलेल्या पतीने मी तुला तलाक देऊन अशी धमकीही दिली. हा वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला तीन वेळा तलाक बोलून तुझा माझा यापुढे संबंध तुटला. असे पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकारामुळे गोंधळलेल्या पत्नीने नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरुद्ध तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2017या नवीन कायद्याअंतर्गत 30 वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पत्नीला बेकायदेशिररित्या तलाक दिल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा