याआधी सरकारने कोरोनाच्या संकटकाळात ईपीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून ३ महिन्याच्या पगाराइतकी रक्कम काढण्याची सूट दिली होती. आता पीएफ काढण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
ईपीपएफकडून पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा देखील वापर करता येणार आहे. यूनिव्हर्सल अकाउंट नंबर आल्यानंतर कर्मचाऱ्याचे पैसे वेगवेगळ्या खात्यामध्ये मात्र एकाच ठिकाणी असतात. त्याकरता नवीन कंपनीमध्ये रूजू झाल्यानंतर युएएन नंबर देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही नवीन खात्यामध्ये जुन्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करून घेऊ शकता. काही स्टेप्ट फॉलो करून ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाइन पार पाडू शकता.
YES Bank घोटाळा: राणा कपूरची २२०० कोटींची संपत्ती जप्त