Advertisement

YES bank घोटाळा: राणा कपूरची २२०० कोटींची संपत्ती जप्त

येस बँकेत घोटाळाप्रकरणी बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.

YES bank घोटाळा:  राणा कपूरची २२०० कोटींची संपत्ती जप्त
SHARES

येस बँकेतील  घोटाळाप्रकरणी बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. कपूर कुटुंबियांच्या मालकीची २२०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. याशिवाय डीएचएफएलचे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.


राणा कपूर यांच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असणारी मालमत्ता जप्त होणार आहे.  यामध्ये मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत पेडर रोडवरचे ६ प्रशस्त फ्लॅट्स आणि मलबार हिलचा आलिशान बंगला यांचा समावेश आहे. लंडनमध्येही राणा कपूर यांची मोठी मालमत्ता आहे.  येस बँकेनं डीएचएफएलला ३७५० कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना ७५० कोटींचे कर्ज दिलं.


येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. २०४ मध्ये त्यांनी येस बँक स्थापन केली आणि २०१९ पर्यंत ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते. याच काळात पैशांची अफरातफर झाली आहे. येस बँकेनं डीएचएफएलला ३७५० कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना ७५० कोटींचे कर्ज दिलं.
संबंधित विषय
Advertisement