ओलाचे सीईओ वर्षभर घेणार नाहीत वेतन, वाहनचालकांना मदत करण्याचा निर्णय

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर काम करणाऱ्यांना बसला आहे. उत्पन्नच ठप्प झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. लॉकडाऊनमुळे खासगी आणि अॅपआधारित टॅक्सी सेवा बंद आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अॅप आधारित टॅक्सी सेवा 'ओला'चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश आगरवाल यांनी पुढील एक वर्ष आपले वेतन न घेण्याचा आणि त्यातून ओलाच्या वाहनचालकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओलाच्या वाहनचालकांना मदत मिळण्यासाठी मदत निधी गोळा करण्यासही सुरुवात करण्यात येणार असल्याचेही  आगरवाल यांनी ट्विट करून सांगितले. आगरवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले  की, हजारो वाहनचालक आणि त्यांचे कुटुंबीय सध्या कोणत्याही उत्पन्नाशिवाय दिवस काढत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही निधी गोळा करण्यास सुरुवात करीत आहोत. याच निधीसाठी मी माझे पुढील वर्षाचे संपूर्ण वेतन देणार आहे. ओलाचे सर्व कर्मचारी या निधीसाठी पैसे देतील. २० कोटी रुपयांचा निधी जमविण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे. 

अगदी कमीत कमी केलेली मदतही या निधीसाठी खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या निधीसाठी पैसे द्यावेत, अशी आमची विनंती आहे, असेही भाविश आगरवाल यांनी म्हटले आहे.


हेही वाचा -

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष


पुढील बातमी
इतर बातम्या