भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

ग्राहकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असं इंडियन ऑईलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर अनेकांना किराणामाल, पेट्रोल, डिझेस आणि गॅस अशा गोष्टांची साठा करण्यास सुरूवात केली. काहींनी लॉकडाऊनची धास्ती घेत सिलिंडरसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तसंच, काही ठिकाणी सिलिंडरसाठी लोकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र, ग्राहकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असं इंडियन ऑईलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती इंडियन ऑईलकडून देण्यात आली आहे. सध्या देशातील सर्व प्रकल्प आणि सप्लाय लोकेशन सुरू आहेत. त्यामुळं ग्राहकांनी भीती बाळगून घाईत सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. एप्रिल महिन्यात आणि त्यानंतर लागणाऱ्या महिन्यांतील इंधनाबाबत माहिती घेतली आहे. त्या दृष्टीनं प्रकल्प काम करत आहे. याव्यतिरिक्त बल्क स्टोरेज पॉईंट्स, एलपीजी डिस्ट्रिब्यूशनशिप आणि पेट्रोल पंप योग्यरित्या काम करत असल्याची माहिती मिळते.

लॉकडाउनमुळं रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळं मार्च महिन्यात पेट्रोलच्या मागणीत ८ टक्क्यांची घट झाली आहे. तर डिझेलच्या मागणीतही १६ टक्क्यांची घट झाली आहे. याव्यतिरिक्त एटीएफची मागणीही २० टक्क्यांनी घसरल्याचं समजतं. या महिन्यात एलपीजीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.   हेही वाचा -

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष

अत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी बेस्टकडून दररोज सुमारे १६०० बस मार्गस्थसंबंधित विषय