Advertisement

अत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी बेस्टकडून दररोज सुमारे १६०० बस मार्गस्थ

मुंबईतील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे दररोज सुमारे १६०० बस चालविल्या जात आहेत.

अत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी बेस्टकडून दररोज सुमारे १६०० बस मार्गस्थ
SHARES

मुंबईतील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे दररोज सुमारे १६०० बस चालविल्या जात आहेत. नवी मुंबई, ठाणे, वसई, विरारहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी विविध ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या दैनंदिन प्रवासाच्या नियोजनासाठी आदल्या दिवशीच्या प्रतिसादाच्या आधारे पुढील दिवसाचं वेळापत्रक आखलं जात आहे.

बऱ्याच भागांत थेट सेवा नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळं बेस्टनं हे मार्ग जोडावेत, अशी सूचनाही केली जात आहे. राज्यात संचारबंदी लागू झाल्यापासून बेस्ट उपक्रमानं एसटीच्या सहकार्यानं बसमार्ग निश्चित केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून बेस्ट बस धावत आहेत. 

एसटीतून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत नेण्यासाठी बेस्टच्या वापर होत आहे. या बसमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अपेक्षित असले तरीही काही वेळा इतर प्रवाशांकडूनही त्याचा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. बेस्टनं शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १६७४ बस चालविल्या असून, त्यासाठी ३,२८४ कंडक्टर आणि सुमारे ३,५०० चालकांचा समावेश आहे. 

विविध सरकारी रुग्णालयांनी केलेल्या विनंतीनुसार त्या कर्मचाऱ्यांना थेट सेवेसाठी काही बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, अन्य काही सरकारी कार्यालयांकडूनही बेस्टकडं बससेवेसाठी विचारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

कोरोनाचं संकट टळेपर्यंत दादरचं भाजी मार्केट बंद

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पास



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा