Advertisement

कोरोनाचं संकट टळेपर्यंत दादरचं भाजी मार्केट बंद

महापालिका आणि पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यात अपयश आल्यानं दादरचं भाजी मार्केट बंद करण्यात आलं आहे.

कोरोनाचं संकट टळेपर्यंत दादरचं भाजी मार्केट बंद
SHARES

दादर येथील सेनापती बापट मार्गावरील घाऊक भाजी मार्केट बंद करण्यात आलं आहे. महापालिका आणि पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यात अपयश आल्यानं दादरचं भाजी मार्केट बंद करण्यात आलं आहे. कोरोनाचे संकट टळेपर्यंत हे मार्केट बंद करण्यात आलं आहे. दादरऐवजी आता चुनाभट्टी येथील सोमय्या मैदान, बीकेसीतील एमएमआरडीए मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका या ठिकाणी हे मार्केट आता भरणार आहे. 

वसई, विरार, पुणे, नाशिकमधून भाजी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना या मैदानांमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेनापती बापट मार्गावरील भाजी मार्केटमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून शेतकरी घाऊक भाजी विक्रीसाठी येत असतात. या मार्केटमध्ये भाज्यांचे २००हून अधिक ट्रक, टेम्पो रोज येतात. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी संसर्ग वाढीसाठी धोकादायक ठरण्याची भीती असल्यानं महापालिका आणि पोलिसांनी विविध उपाययोजना करून ही गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आलं. त्यामुळं ही गर्दी कमी करण्यासाठी हे मार्केट तात्पुरते बंद करून उपनगरात ४ ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. 

सोमय्या मैदान, चुनाभट्टी 

पुणे व नाशिकमधून येणारी वाहने व घाटकोपर ते माटुंगा येथील व्यापारी येथे येतील.

एमएमआरडीए मैदान, बीकेसी

पुणे व नाशिकमधून येणारी वाहने व वांद्रे ते गोरेगाव येथील व्यापारी येथे येतील.

दहिसर जकात नाका

पुणे व नाशिकमधून येणारी वाहने व मुलुंड ते घाटकोपर येथील व्यापारी येथे येतील.

सेनापती बापट मार्ग, दादर

वसई, विरार येथून येणारी वाहने व दहिसर ते मालाड येथील व्यापारी येथे येतील.

सेनापती बापट मार्ग, दादर

वसई, विरार येथून येणारी वाहने व मुंबई शहर विभागातील व्यापारी येथे येतील.हेही वाचा -

मध्य रेल्वेतर्फे मोफत फूड पॅकेट वितरण व रक्तदान शिबिराचे आयोजन

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पाससंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा