१४ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • व्यवसाय

पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच नियंत्रणात ठेवण्यात येतील, या केंद्र सरकारच्या घोषणा पोकळ ठरताना दिसत आहे. कारण पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग १४ व्या दिवशीही वाढ नोंदवण्यात आली. रविवारी पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर १५ पैसे, तर डिझेलच्या दरांत प्रति लिटर १७ पैशांनी वाढ झाली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५.९३ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर ७३.५३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.

१३ दिवसांत किती वाढ?

गेल्या १३ दिवसांत पेट्रोलच्या दरात ३.२८ रुपयांनी वाढ झाली. तर डिझेलच्या दरात ३.१० रुपयांन वाढ झाली आहे.

जीएसटीच्या कक्षेत कधी?

मोदी सरकारला शनिवारी चार वर्षे पूर्ण झाली. जनतेला 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवणाऱ्या भाजपा सरकारला पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यात अपयश येत असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्यात येतील या बाताही यामुळे पोकळ वाटू लागल्या आहेत.

बजेट कोलमडलं

त्यातच इंधनदरवाढीमुळे मालवाहतूकदारांनी १ जूनपासून २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजीपाल्यांचे दर वाढून सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.


हेही वाचा-

जीवनावश्यक वस्तू महागणार! मालवाहतूकदारांची २० टक्के दरवाढ


पुढील बातमी
इतर बातम्या