PNB घोटाळा: नीरव मोदी फरार घोषित

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला विशेष पीएमएलए न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. वारंवार समन्स बजावूनही नीरव मोदी न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याला नव्या कायद्यान्वये फरार गुन्हेगार घोषित करावे, अशी विनंती सक्तवसुली संचालनालयानं (ईडीनं) अर्जाद्वारे केली होती. 

गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. आता न्यायालयाच्या परवानगीनं ईडीद्वारे मोदीची संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. ४ हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळा प्रकरणात नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी व निकटवर्तीय सुभाष परब हे तिघेही आरोपी आहेत.  मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित आहे.

नीशल आणि सुभाष परब यांचा ठावठिकाणा नाही. गुन्हा नोंदवण्यापूर्वी तिघेही देशाबाहेर फरार झाले, त्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढता आले नाही. त्यानंतर न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले, तरीही ते हजर झाले नाहीत असं न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. 


हेही वाचा -

PNB घोटाळा : नीरव मोदीला बँकेनेच दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे


पुढील बातमी
इतर बातम्या