Advertisement

PNB घोटाळा : नीरव मोदीला बँकेनेच दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे

या घोटाळ्याला पंजाब नॅशनल बँकच जबाबदार असल्याचं धक्कादायक वास्तव तपासातून समोर आलं आहे.

PNB घोटाळा : नीरव मोदीला बँकेनेच दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे
SHARES

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) तब्बल १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक करून हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये पळून गेला आहे. या घोटाळ्याबाबत आता खळबळजनक बाब समोर आली आहे. या घोटाळ्याला पंजाब नॅशनल बँकच जबाबदार असल्याचं धक्कादायक वास्तव तपासातून समोर आलं आहे. या घोटाळ्याला पंजाब नॅशनल बँकच जबाबदार असल्याचं धक्कादायक वास्तव तपासातून समोर आलं आहे. 

 पीएनबीने या घोटाळ्याचा तपास २०१८ मध्ये बेल्जिअमच्या ऑडिटर बीडीओकडे सोपवला होता. ऑडिटरने २०१८ पर्यंत देण्यात आलेल्या माहितीची पडताळणी केली. तपासात पीएनबीनेच २८ हजार कोटी रुपयांचे १५६१ हमीपत्रे (लेटर ऑफ अंडरटेकिंग) नीरव मोदी ग्रुपला दिल्याचे समोर आले. यामधील २५ हजार कोटींची १३८१ हमीपत्रे ही बेकायदा पद्धतीने देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा हा घोटाळा होण्यास पीएनबीच जबाबदार असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. 

तसंच ज्या २३ निर्यातदारांच्या नावे ही हमीपत्रे काढण्यात आली होती त्यांपैकी २१ जणांवर नीरव मोदीचे नियंत्रण होते, हे पण तपासात समोर आलं आहे.  त्यानंतर बँकेला पैसे देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या १९३ हमीपत्रांचा गैरवापर केला गेला. ऑडिटरने या चौकशीशी संबंधीत ५ हंगामी आणि एक अंतिम अहवाल बँकेला सोपवला आहे.

बीडीओच्या टीमने नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियांच्या सर्व संपत्तींची यादी बनवली आहे. या यादीप्रमाणे नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियांच्या भारतात २० मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा कोणत्याच आर्थिक देवाण-घेवाणीत तारण म्हणून वापर करण्यात आलेला नाही. तर नीरव मोदीच्या भारतात १३०० कोटी रुपयांच्या अशा १५ मालमत्ता आहेत ज्यांचा वापर तारण म्हणून करण्यात आला आहे. त्याचबरोबर नीरव मोदीच्या परदेशातील १३ स्थावर मालमत्ताबाबतही माहिती मिळाली आहे.



हेही वाचा  -

PMC घोटाळा : आणखी तिघांना अटक

आता 'इतक्या' दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट, 'ट्राय'चा नवा नियम




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा