PMC घोटाळा : आणखी तिघांना अटक

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.

SHARE

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील (पीएमसी) घोटाळाप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.  संचालक जगदीश मुखी, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्य मुक्ती बावीसी, संचालक आणि रिकव्हरी समिती सदस्य तृप्ती बने अशी आरोपींची नावे आहेत. या घोटाळ्यातील आरोपींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.

आरोपीच्या चौकशीतून जगदीश मुखी, मुक्ती बावीसी आणि तृप्ती बने यांची नावं समोर आली होती. मुखी हे पीएमसीचे संचालक असून  २००५ ते २०२० या कालावधीकरिता ते ऑडिट समितीचे सदस्य आहेत. पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली. 

या घोटाळाप्रकरणी भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा राजनीत सिंग याच्यासह एचडीआयएल कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांच्यासह पीएमसीचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वारियामसिंग कर्तारसिंग आणि एस. सुरजितसिंग अरोरा यांना अटक केली आहे. एचडीआयएल आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच तीन ऑडिटरही अटकेत आहेत.
 
संबंधित विषय
ताज्या बातम्या