PMC घोटाळा : तिसऱ्या ऑडिटरला अटक

पीएमसी बँकेत तब्बल ४,३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी यापूर्वी दोघा ऑडिटरना अटक केली होती.

PMC घोटाळा : तिसऱ्या ऑडिटरला अटक
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आता आणखी एका ऑडिटरला अटक केली आहे. अनिता किरदत (३५) असं या महिला ऑडिटरचं नाव आहे. अनिता किरदत यांच्या अटकेनंतर आरोपींची संख्या आठवर गेली आहे. 

पीएमसी बँकेत तब्बल ४,३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी यापूर्वी दोघा ऑडिटरना अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने अनिता किरदत यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. किरदत यांना न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्येक महिन्याला छाननी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. बँक व्यवहारांमधील अनियमिततेकडं दुर्लक्ष केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने लेखापरीक्षणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सोमवारी पीएमसी बँकेच्या जयेश शाह आणि केतन लकडावाला या दोन लेखापरीक्षकांना अटक केली होती.  हा घोटाळा झाला तेव्हा या दोघांनी बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यांनी बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा लपवण्यात महत्वाची भूमिका बजावली असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. 



हेही वाचा  -

अॅण्टॉप हिलमध्ये दोन बहिणींवर अत्याचार

बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा