बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक

मध्य रेल्वेवर बनावट तिकीट तपासनीसांकडून प्रवाशांना घाबरवून पैसे उकळण्यात येत असल्याची माहिती एन. बी. सकपाळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासणीही सुरू केली होती.

बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक
SHARES

तिकिट नसलेल्या प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या बनावट तिकीट तपासनीसाला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गौतम विश्वास सहस्रबुद्धे असं या भामट्याचं नाव आहे. त्याने अनेक प्रवाशांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. सीएसएमटीचे मुख्य तिकीट निरीक्षक एन. बी. सकपाळ यांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी गौतमला बेड्या ठोकल्या. 

मध्य रेल्वेवर बनावट तिकीट तपासनीसांकडून प्रवाशांना घाबरवून पैसे उकळण्यात येत असल्याची माहिती एन. बी. सकपाळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपासणीही सुरू केली होती.  दादर पादचारी पुलावर बुधवारी दुपारी गौतम प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याचं सकपाळ यांच्या निदर्शनास आलं. सकपाळ यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मात्र, त्याने ओळखपत्र न दाखवता अरेरावीची भाषा वापरण्यास सुरूवात केली. गौतमने तेथून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. सकपाळ यांनी मात्र गौतमला पकडले आणि दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकपाळ यांनी गौतम सहस्रबुद्धे नावाचा तिकीट तपासनीस आहे का याची विचारणा तिकीट कार्यालयात केली. यावेळी या नावाची व्यक्ती या कार्यालयात कार्यरत नसल्याची माहिती देण्यात आली.  गौतम हा बनावट तिकीट तपासनीस असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी गौतमवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 



हेही वाचा  -

व्यापाऱ्यांना बनावट सोनं विकणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक

लाॅजिस्टिक कंपनीची पैशाने भरलेली व्हॅन पळविणाऱ्यास अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा