व्यापाऱ्यांना बनावट सोनं विकणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक

या टोळीने आतापर्यंत नवी मुंबई, ठाणे, मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांना अशा प्रकारे गंडवल्याचं पुढं आलं आहे.

SHARE

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील व्यापाऱ्यांना बाजार भावापेक्षा कमी किंमतीने सोनं देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी अटक केली आहे. इरफान मलिक असे या आरोपीचे नाव आहे. त्याने आणि त्याच्या साथीदाराने अनेक व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडवल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली. 

कांदिवली परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यापाऱ्याचा सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी सोने खरेदीसाठी झवेरी बाजार येथे गेले होते. त्या ठिकाणी दोघांनी व्यापाऱ्याचा रस्ता अडवत त्याला प्रती तोळा ३० हजार रुपयांनी सोनं देतो असं सांगितलं. व्यापाऱ्याने सोनं तपासले असता ते सोनं खरं होतं. त्यानुसार दोघांनी पुढील व्यवहारासाठी व्यापाऱ्याचा मोबाइल नंबरही घेतला. मात्र त्या दोघांच्या आमिषाला व्यापारी बळी पडला नाही.

५ नोव्हेंबर रोजी पुन्हा त्यांनी व्यापाऱ्याशी संपर्क करून त्याला प्रती तोळा २० हजार रुपयांनी सोने देतो असं सांगितलं. व्यापाऱ्याला दोघांवर संशय आल्याने त्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी व्यापाऱ्याच्या मदतीने सापळा रचला. व्यापाऱ्याने आरोपींना १० तोळ्याची सोन्याची बिस्किटे घेऊन बोलावलं. आरोपी दिपक सोने घेऊन त्या ठिकाणी आला. तर इरफान हा दुरून या दोघांच्या भेटीवर लक्ष ठेवून होता. खाञी पटल्यानंतरच इरफान व्यापाऱ्याला भेटायला पुढे गेला. पैशांचा व्यवहार झाल्यानंतर सोने पैशांची बँग घेऊन गाडी आणण्यास सांगून निघून गेला. तर इरफानला त्याच्या साथीदारांनी पोलिस असल्याचे सांगून रिक्षात बसवून नेले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने कस्तुरबा पोलिसात तक्रार नोंदवली.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे सोपवल्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने सोने याला प्रथम अटक केली. माञ या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी इरफानचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली. या टोळीने  आतापर्यंत नवी मुंबई, ठाणे, मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांना अशा प्रकारे गंडवल्याचं पुढं आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


संबंधित विषय
ताज्या बातम्या