Advertisement

लाॅजिस्टिक कंपनीची पैशाने भरलेली व्हॅन पळविणाऱ्यास अटक


लाॅजिस्टिक कंपनीची पैशाने भरलेली व्हॅन पळविणाऱ्यास अटक
SHARES
Advertisement
मालाडच्या मालवणी परिसरात पैशाने भरलेली लॉजीस्टिक कंपनीची व्हॅन पळवणाऱ्यास बांगूरनगर पोलिसांनी अटक केली आहे शेर अली (47) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मालाडच्या मालवणी परिसरातील कलेक्टर कंपाऊडमध्ये राहुल खरे आणि अली हे पैसे एटीएममध्ये भरण्यासाठी हॉटेल पॉपपेज, मिंट चौकी, जुनेत हॉस्पिटल जवळ, लिंक रोड, मालाड (प) आले होते. लॉजीस्टिक कंपनीचे व्हॅनमध्ये असलेले लाखो रुपये पाहून अलीच्या मनात लालसा निर्माण झाली होती. व्हॅनवरील खरे हा सुरक्षा रक्षक गाडीतून उतरल्याचे पाहून अलीने पैशांनी भरलेली गाडी पळवली. या प्रकरणी खरेने बांगूर पोलिस ठाणे गाठत अली विरोधात तक्रार नोंदवली. व्हॅनमध्ये तब्बल 72 लाख 60 हजार 974 रुपये असल्याचे खरेने तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर गाडीत असलेल्या जीपीआरएसनुसार पोलिसांनी गाडीचा माग काढण्यास सुरूवात केली. त्यानुसार पोलिसांनी दहिसर परिसरातून अलीला गाठून अटक केली. पैशाच्या लालसेतूनच त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केल आहे.


हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement