मोलकरणीनं घातला २९ लाखांना गंडा

ऋषिराज खतुरीया हे व्यापारी असून २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या पत्नीला घरातील कपाटातून हिरे, सोन्याचे दागिने, अमेरिकन डॉलर, थायलंडचे चलन आणि दीड लाखांची रोकड असा २९ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचं आढळून आलं.

SHARE

मोलकरणीने आपल्या मैत्रीणीच्या मदतीने सांताक्रूझ येथील व्यापाऱ्याला  २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. सांताक्रूझ पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. स्नेहा श्रीपल्ली आणि कोमल वाघे अशी त्यांची नावे आहेत. 

ऋषिराज खतुरीया हे व्यापारी असून  २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या पत्नीला घरातील कपाटातून हिरे, सोन्याचे दागिने, अमेरिकन डॉलर, थायलंडचे चलन आणि दीड लाखांची रोकड असा २९ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचं आढळून आलं. या प्रकरणी ऋषिराज यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. तपासात ऋषिराज यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला चोरी करताना दिसून आली.

फुटेजवरून पोलिसांनी तिचा माग घेतला. यावेळी तिचं नाव स्नेहा श्रीपल्ली असून, ती शेजारच्या सोसायटीत काम करत असल्याचं समजलं. पोलिसांनी स्नेहाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिने ऋषिराज यांची मोलकरीण कोमल वाघे हिच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघींना अटक करून त्यांच्याकडून २३ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. हेही वाचा -

Exclusive : मुंबईची सुरक्षा धोक्यात, पोलिसांचे सीसीटिव्ही आपरेटर स्ट्राइकवर

नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना लाखोंचा गंडा, दोघांना अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या