अॅण्टॉप हिलमध्ये दोन बहिणींवर अत्याचार

वेदनांनी असह्य झालेल्या मुली घरी परतल्यानंतर रडू लागल्या. त्यावेळी घरातल्यांनी विचारणा केली असता मुलींनी चांदने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली.

अॅण्टॉप हिलमध्ये दोन बहिणींवर अत्याचार
SHARES

चाॅकलेटचं आमीष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या सराईत आरोपीला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत.  चांद शेख (२०) असं या आरोपीचे नाव आहे. पीडितांच्या आईने वडाळा टीटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन हा सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अॅण्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या  दोन अल्पवयीन मुली मंगळवारी घरातील अंगणात खेळत होत्या. मुलींच्या आसपास घरातील कुणी व्यक्ती दिसून येत नसल्याचा  फायदा घेत चांदने दोन्ही मुलींना चाॅकलेट देण्याचे आमीष दाखवलं. त्याने सार्वजनिक शौचालयात नेऊन या दोघींवर बलात्कार केला. वेदनांनी असह्य झालेल्या मुली घरी परतल्यानंतर रडू लागल्या. त्यावेळी घरातल्यांनी विचारणा केली असता मुलींनी चांदने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली.

या प्रकरणी मुलीच्या आईने वडाळा टीटी पोलिस ठाण्यात चांद विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी चांदला अटक केली आहे.  या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असून त्यापैकी एक ८ वर्षीय तर, दुसरी ९ वर्षाची आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

सीसीटिव्ही कक्षाचे काम सुरळीत, मुंबई पोलिसांकडून खुलासा

बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय