PMC घोटाळा : वैद्यकीय उपचारासाठी काढता येणार १ लाख रुपये

पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आहेत.

PMC घोटाळा : वैद्यकीय उपचारासाठी काढता येणार १ लाख रुपये
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे.  वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांना आता १ लाख रुपये काढता येणार आहेत. याआधी वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपये काढता येत होते.

पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे खात्यात पैसे असूनही काढता येत असल्याने अडचणीच्या काळात खातेदार हवालदिल झाले आहेत.  वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची आधी मर्यादा ५० हजार रुपये होती. रिझर्व्ह बँकेने उच्च न्यायालयाला मंगळवारी सुनावणीवेळी सांगितलं की, वैद्यकीय उपचारासाठी पैसे काढण्याची मर्यादा वाढवून १ लाख रुपये केली आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने एक मध्यस्थ नेमला आहे. या मध्यस्थाकडे ग्राहकांना अर्ज करून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत १ लाख रुपये काढता येणार आहेत. 

पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होती. यावेळी न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या ग्राहकांनी आरबीआयविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरबीआय चोर है, हमारा पैसा वापस कर दो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याआधी बँक ग्राहकांनी आरबीआयच्या कार्यालयाबाहेर जमत निदर्शने केली होती. हेही वाचा -

PMC बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठेवीदारांची हायकोर्टाबाहेर निदर्शने
संबंधित विषय