PMC बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठेवीदारांची हायकोर्टाबाहेर निदर्शने

पंजाब आणि महाराष्ट्र (PMC) काे-आॅपरेटीव्ह बँकेवरील निर्बंधांमुळे अडचणींचा सामना करत असलेल्या बँकेच्या संतप्त खातेधारकांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर निर्दशने केली.

SHARE

पंजाब आणि महाराष्ट्र (PMC) काे-आॅपरेटीव्ह बँकेवरील निर्बंधांमुळे अडचणींचा सामना करत असलेल्या बँकेच्या संतप्त खातेधारकांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर निर्दशने केली. 

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI)ने पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होती. याआधीच्या सुनावणीत आरबीआयने लादलेल्या निर्बंधासंदर्भातील प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आरबीआयने बँकेतील ठेवीदारांची रक्कम सुरक्षित ठेवण्यासंदर्भातील विस्तृत अहवाल न्यायालयाला सादर केला. तसंच बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आल्याचीही माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढं ढकलली.    

हेही वाचा- पीएमसी घोटाल्यातील आरोपी रणजित सिंगच्या घराची ईडीकडून झडती

यावेळी न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या पीएमसी बँक ग्राहकांनी आरबीआयविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आरबीआय चोर है, हमारा पैसा वापस कर दो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याआधी बँक ग्राहकांनी आरबीआयच्या कार्यालयाबाहेर जमत निदर्शने केली होती. 

तब्बल ४,३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी पीएमसी बँकेचा माजी संचालक रणजीत सिंग याला अटक केली होती. त्यानंतर रविवारी ईडीने त्याच्या घरी छापा टाकला. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता ९ वर पोहोचली आहे.हेही वाचा-

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दोन लेखापरीक्षकांना अटक

पीएमसी बँक प्रकरणात आठव्या खातेदाराचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या