पीएमसी बँक प्रकरणात आठव्या खातेदाराचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी त्यांना फफ्फुसाचा आजार झाला होता. त्यासाठी त्यांना नियमित औषध आणि डाँक्टरकडे उपचारासाठी जावे लागायचे. उपचारासाठी येणारा खर्च ही जास्त होता.

SHARE

पीएमसी बॅँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेने आणखी एका खातेदाराचा गुरूवारी बळी गेला आहे. गंभीरबाब म्हणजे अ‍ॅड्य्रू लोबो (७४) याला उपचारासाठी ज्या वेळी रुग्णालयात नेले होते. त्यावेळी उपचारासाठी देखील त्याच्याजवळ पैसे नव्हते. त्याचे बँकेत २६ लाख रुपये अडकलेले होते.

आरबीआयने बॅकेवर निर्बंध आणल्याने त्यांना बॅँकेतून पैसे काढणे कठीण झाले होते. ठाण्यात काशेली येथे राहणाऱ्या अ‍ॅड्य्रू लोबो यांचे ही पीएमसीत खाते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना फफ्फुसाचा आजार झाला होता. त्यासाठी त्यांना नियमित औषध आणि डाँक्टरकडे उपचारासाठी जावे लागायचे. उपचारासाठी येणारा खर्च ही जास्त होता. योग्य वेळी त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे मिळत नसल्यामुळे अ‍ॅड्य्रू लोबो वैफल्यग्रस्त झाले होते. त्या तणावातूनच त्यांचा मृत्यू झाला. पीएमसी बँकेत अ‍ॅड्य्रू लोबो  यांचे २६ लाख रुपये अडकलेले होते. आतापर्यंतचा हा आठवा बळी आहे. याआधी पीएमसी बँकेंच्या सात खातेदारांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या