पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दोन लेखापरीक्षकांना अटक

या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती बँकेचे आँडीटर केतन लकडावाला, जयेश सांघानी यांनी आरबीआयकडे लपवत बनावट अभिलेख तयार केला.

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात दोन लेखापरीक्षकांना अटक
SHARES
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) सोमवारी रात्री उशिरा पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक पीएमसी घोटाळ्याप्रकरणी दोन लेखापरीक्षकांना अटक केली. केतन लकडावला, जयेश सांघानी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी बँकेचे आँडीट करताना, जाणून बुजून या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी ही अटक केली आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती बँकेचे आँडीटर केतन लकडावाला, जयेश सांघानी यांनी आरबीआयकडे लपवत बनावट अभिलेख तयार केला. त्यात दोघांनी बँकेच्या कर्जवसूलीबाबत चिंता व्यक्त करत बँकेची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला.
दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. कर्ज देणाऱ्या बँकेतील कमिटीवरील पदाधिकाऱ्यांची कालांतराने पोलिसांनी धरपकड सुरू केली. या नियमबाह्य कर्ज देण्याच्या प्रक्रियेकडे केतन आणि जयेश यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते. त्यामुळेच पोलिसांनी दोघांना चौकशीला बोलवत अटक केली. या प्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे  पोलिस अधिक तपास करत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा