१ नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया बदलणार

एलपीजी घरगुती गॅसची होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रणाली १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. घरगुती सिलेंडर्सचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्या नवीन प्रणाली लागू करणार आहेत. 

ग्राहकांना नव्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. नवीन नियमानुसार गॅस वितरकाकडे तुमची अद्ययावत माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला सिलिंडर घरपोच मिळणार नाही. या नवीन प्रणालीला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) असं नाव दिलं आहे.  सिलेंडर बुक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तु्म्हाला सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल.

एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर वितरकाकडे अपडेट केला नसेल तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक अॅप असेल. अॅपच्या  माध्यमातून तुम्ही तात्काळ तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला लगेच कोड मिळेल. पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा असलेल्या ग्राहकांची एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.

सध्या ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर जयपूरमध्ये राबवण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ नोव्हेंबरपासून १०० स्मार्ट सिटीजमध्ये नव्या प्रणालीनुसार गॅस वितरण केले जाणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत एका दिवसात विक्रमी १६,७०० चाचण्या

आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिर


पुढील बातमी
इतर बातम्या