Advertisement

मुंबईत एका दिवसात विक्रमी १६,७०० चाचण्या


मुंबईत एका दिवसात विक्रमी १६,७०० चाचण्या
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महापालिकेनं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मुंबईकरांना योग्य उपचार मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असून मुंबईत महापालिकेनं चाचण्यांचा १३ लाखांचा टप्पा पार केला आहे. १४ ऑक्टोबरला एका दिवसात विक्रमी १६,७०० चाचण्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गुरुवारी दिवसभरात २,११९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ४६ जणांचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना चाचण्या वाढवण्यास सांगितले असून दर दिवशी १६ ते २० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी मुंबईत १६,७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी २१ टक्के अहवाल बाधित आले. यात ७८०० प्रतिजन चाचण्या तर ८९०० आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.

आरटीसीपीआर चाचण्यांमध्ये १५ टक्के, तर प्रतिजन चाचण्यांमध्ये ६ टक्के रुग्ण बाधित आढळले. मागील महिन्याच्या तुलनेत कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुप्पट केल्यामुळं मुंबईत २ हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या दिसत आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापालिका कटिबद्ध असून मास्क न घालता फिरणारे आणि अंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

यासाठी २४ विभागांमध्ये २५०० मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा