आजपासून ३ दिवस सरकारी बँका बंद

आज शुक्रवारपासून ३ दिवस सरकारी बँका बंद राहतील. बँक संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. २ फेब्रुवारी रोजी रविवार आहे. त्यामुळे या दिवशी बँक बंद असेल. त्याचबरोबर बँक संघटनांनी मार्च महिन्यात ३ दिवस आणि एक एप्रिलपासून अनिश्चितकालीन संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनने म्हटलं आहे की,  ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांमध्ये संप होईल. त्याचबरोबर मार्चमध्ये ११, १२ आणि १३ तारखेला संप पुकारण्यात येणार आहे. बँक संघटनांनी १ एप्रिलपासून अनिश्चित संपावर जाण्याची घोषणा केली आहे. बँक कर्मचारी संघटनांनी १२.२५ टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) ने फेटाळून लावली आहे. याशिवाय विशेष भत्ते आणि कायम स्वरूपी पाच दिवसांचा आठवडा या मागण्या सरकारने फेटाळल्या आहेत. सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्चमध्ये आणखी ३ दिवस संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

ह्या आहेत मागण्या

  • पगारामध्ये किमान २० टक्के वाढ
  • पाच दिवसांचा आठवडा करावा
  • मूलभूत वेतनात विशेष भत्ता विलीन
  • एनपीएस काढून टाका
  • निवृत्तीवेतनाचे अपडेशन
  •  निवृत्तीवेतनात सुधारणा
  • नफ्याच्या आधारे कर्मचारी कल्याण निधीचे वितरण
  • सेवानिवृत्तीनंतर प्राप्तिकर लाभ
  • तास व जेवणाच्या तासांचे योग्य वितरण.
  • अधिकाऱ्यांसाठी कामकाजाचे तास नियमित करणे.

हेही वाचा -

राहुल बजाज सोडणार बजाज ऑटोचं अध्यक्षपद

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांच्या पाया पडतात...


पुढील बातमी
इतर बातम्या