Advertisement

राहुल बजाज सोडणार बजाज ऑटोचं अध्यक्षपद

वाहनक्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) चे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) आता अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. टाटा समूहाचे रतन टाटा (Ratan Tata) यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते बजाज समूहाच्या निर्णयामध्ये थेट सहभाग घेणार नाहीत.

राहुल बजाज सोडणार बजाज ऑटोचं अध्यक्षपद
SHARES

वाहनक्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) चे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) आता अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. टाटा समूहाचे रतन टाटा (Ratan Tata)  यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते बजाज समूहाच्या कोणत्याही निर्णयामध्ये थेट सहभाग घेणार नाहीत.  राहुल बजाज यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२० ला संपणार आहे. त्यानंतर ते आता ते कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (Non-Executive Director) च्या भूमिकेत राहतील.

राहुल बजाज (Rahul Bajaj) यांनी मागील ५० वर्षांपासून बजाज समूहाची (Bajaj Group) धुरा सांभाळली आहे. बोर्डने त्यांना एप्रिल 2015 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा होता. ३१ मार्चपासून ते अध्यक्षपदावर नसतील. बजाज ऑटोने गुरूवारी ही माहिती दिली आहे. बजाज ऑटोच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी राहुल बजाज यांना नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर  (Non-Executive Director) म्हणून मंजुरी दिली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० पासून सुरू होणार आहे.

राहुल बजाज (Rahul Bajaj) यांनी १९६५ मध्ये बजाज समूहाचे सुत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा व्यवसाय ७.२ कोटींवरून १२ हजार कोटी रुपयांवर गेला. २००५ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा राजीवकडे जबाबदाऱ्या देण्यास सुरूवात केली. राजीव बजाज यांना व्यवस्थापकीय संचालक बनविले होते. १९७२ मध्ये बजाज ऑटोने आपली चेतक स्कूटर (Chetak scooter) लाँच केली. ही स्कूटर बाजारात आली आणि देशातल्या तरुणांसोबत सगळ्यांचीच लाडकी झाली.त्याकाळी बजाजची चेतक स्कूटर घ्यायची असेल तर ४ ते ५ वर्षांचा वेटिंग पिरेड होता.

राहुल बजाज  (Rahul Bajaj) यांचा जन्म १० जून १९३८ ला झाला. ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहुल बजाज यांनी ३ वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतलं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षणही घेतलं. त्यानंतर त्यांनी ६० च्या दशकात हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली.



हेही वाचा -

नारायण मूर्ती जेव्हा रतन टाटांच्या पाया पडतात...

SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा