
जीआरपीने (GRP) 6 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या अचानक निदर्शनांप्रकरणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघटनेच्या (CRMS) पदाधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवली. त्यानंतर संघटनेने प्रशासनाविरोधातील भूमिका आणखी कठोक केली आहे.
संघटनेच्या बोर्डवर लावलेल्या नोटीसमध्ये सदस्य लवकरच ‘वर्क-टू-रूल’ आंदोलनाचा मार्ग अवलंबू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
वर्क-टू-रूल म्हणजे काय?
वर्क-टू-रूल म्हणजे कर्मचाऱ्यांचा असा आंदोलनाचा प्रकार जिथे कर्मचारी प्रत्येक नियम, प्रक्रिया आणि प्रोटोकॉल अतिशय काटेकोरपणे पाळतात. म्हणजेच रोजच्या कामात वापरली जाणारी लवचिकता, गती, समन्वय आणि स्वविवेक पूर्णपणे बंद करतात.
दैनंदिन कामकाजात कर्मचारी अनेक वेळा काही गोष्टी वेगात, शॉर्टकटने किंवा अनुभवाच्या बळावर करतात, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्था सुरळीत चालते. पण वर्क-टू-रूलमध्ये ते काहीही एक इंचही जास्त करत नाहीत.
कर्मचारी ड्युटीवर असले तरी या काटेकोरपणामुळे कामकाजाची गती मंदावते. एन्ट्री-एग्जिट उशिरा होणे, जास्त वेळ थांबे, यार्डमधील हालचाली धीम्या होणे आणि अखेरीस संपूर्ण नेटवर्कच्या वेळेवर परिणाम होऊन गाड्या उशिरा धावणे.
संघटनेची भूमिका
विभागीय सचिव एस. के. दुबे म्हणाले, “या प्रकरणांबद्दल आम्हाला वृत्तपत्रांमधून माहिती मिळाली. जीआरपीने आमच्या कोणत्याही सदस्याला किंवा पदाधिकाऱ्याला आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.” प्रस्तावित वर्क-टू-रूल आंदोलनाच्या वेळेबद्दल ते म्हणाले, “आम्ही आंदोलन सुरू करण्याआधी प्रशासनाला योग्य नोटीस दिली जाईल.”
वादाची पार्श्वभूमी
6 नोव्हेंबरला CSMT येथील मोटरमन–गार्ड लॉबीमध्ये झालेल्या अचानक निदर्शनांमधून हा वाद सुरू झाला. 9 जून रोजी मुंब्रा येथे पाच प्रवाशांच्या मृत्यू प्रकरणात दोन सीआर अभियंत्यांवर एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर त्याविरोधात हे निदर्शन झाले.
दोन CRMS पदाधिकाऱ्यांसह 30-40 समर्थकांवर पीक तासात उपनगरी सेवा जवळपास एक तास रोखल्याचा आरोप आहे. याचे दुष्परिणाम गंभीर होते. सँडहर्स्ट रोड परिसरात रुळांवरून चालत जाणाऱ्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आणि तीन जखमी झाले, कारण त्यांना समोरून येणाऱ्या गाडीने धडक दिली.
CRMS चा आरोप आहे की एफआयआरचा आधार असलेल्या VJTI च्या तांत्रिक अहवालात “मोठ्या त्रुटी” आहेत. बाह्य संस्थांचा वापर कर्मचाऱ्यांना “त्रास देण्यासाठी” आणि त्यांचा मनोबल खच्ची करण्यासाठी केला जातो, असा त्यांचा दावा आहे.
CRMS अध्यक्ष प्रवीण वाजपेयी म्हणाले की CSMT येथील आंदोलन हे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाबाहेरील अधिकृत निदर्शनानंतर कामगारांची “अचानक प्रतिक्रिया” होती.
रेल्वे पोलिसांचे म्हणणे
रेल्वे पोलिसांनी सांगितले की तपास सुरू आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
हेही वाचा
