Advertisement

SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ

जर तुमचं स्टेट बँक आॅफ इंडिया (state bank of india-sbi) मध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं खातं आता बँकेकडून गोठवलं (फ्रीझ) जाऊ शकतं. एसबीआयने ग्राहकांना तसा अलर्टच दिला आहे.

SBI चा ग्राहकांना अलर्ट, या' कारणामुळं खातं होणार फ्रीझ
SHARES

जर तुमचं स्टेट बँक आॅफ इंडिया (state bank of india-sbi) मध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं खातं आता बँकेकडून गोठवलं (freeze- फ्रीझ) जाऊ शकतं. एसबीआयने ग्राहकांना तसा अलर्ट (Alerts) च दिला आहे. ह्या अलर्टकडे खातेधारकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना चांगलंच महागात पडू शकतं.

एसबीआयने आपल्या खातेधारकांना केवायसी (KYC) अपडेट (update) करण्याचं आवाहन केलं आहे. जर खातेधारकांनी  केवायसी अपडेट केलं नाही तर त्यांचं खातं गोठवलं जाऊ शकतं. एसबीआयने २८ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याची विनंती केली आहे. बँकांमध्ये Know Your Customer म्हणजेच KYC करणं हे अत्यंच महत्त्वाचं असतं. केवायसी अपडेट न केलेल्या ग्राहकांना एसबीआयने नोटीस पाठवली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नाहीत तर अशी खातं गोठवलं जातील असा इशारा एसबीआय (sbi) ने आपल्या ग्राहकांना दिला आहे. 

 केवायसी (KYC) अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट
  • वोटर आयडी कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • आधार कार्ड
  • मनरेगा कार्ड
  • पॅन कार्ड
  • फोटो

ग्राहकांना सल्ला

एसबीआय (sbi) आपल्या ग्राहकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बँक गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी माहिती देत आहे. एटीएम (ATM) कार्डाचे डिटेल्स आणि पिन (PIN) च्या माध्यमातून पैसे चोरण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे एसबीआयने ग्राहकांना एटीएम कार्ड आणि पिन क्रमांक सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.


एटीएम कार्डशिवाय पैसे

एटीएम कार्ड  (atm card) शिवाय पैसे काढण्यासाठी एसबीआय (State Bank Of India)च्या ग्राहकांना आपल्या मोबाइलमध्ये योनो अॅप (Yono app) डाउनलोड करावं लागणार आहे. यामध्ये लॉगइन (Login) करणे आवश्यक आहे.लॉगइन केल्यानंतर योनो अॅपमध्ये 6 डिजीट क्रमांकाचा MPIN सेट करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला योनो कॅशवर क्लिक करून एटीएम सेक्शनमध्ये जाऊन रक्कम टाकावी लागेल. रक्कम टाकल्यानंतर ग्राहकाच्या मोबाइल (mobile) क्रमांकावर एसबीआय योनो कॅश ट्रान्झेक्शन नंबर पाठवेल. हा नंबर एटीएम (atm) मध्ये टाकून ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येतील. पैसे काढताना ग्राहकाला आपल्या एटीएम पासवर्ड माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा नंबर 4 तासांसाठीच राहणार आहे. एसबीआयच्या एटीएमच्या मुख्यपृष्ठावर ग्राहकाला विना एटीएमकार्ड व्यवहाराचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर योनो कॅश आणि उर्वरित माहिती द्यावी लागणार आहे. यातून फक्त ५०० रूपयापासून 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. 


  • एसबीआयने २८ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याची विनंती केली आहे.
  • खातेधारकांनी  केवायसी अपडेट केलं नाही तर त्यांचं खातं गोठवलं जाऊ शकतं.

हेही वाचा -

ATM कार्ड शिवाय काढता येणार पैसे

आता मित्रांचाही विमा काढता येणार, फ्रेंड इन्शुरन्सला आयआरडीएची मान्यता

संपामुळे सरकारी बँका सलग ३ दिवस बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा