Advertisement

ऐन दिवाळीत फटाक्यांचा तुटवडा

फटाके सुकण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र यंदा तेथे पावसामुळे फटाके सुकवण्यात अडचण निर्माण झाली. यामुळे तेथील कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवले होते.

ऐन दिवाळीत फटाक्यांचा तुटवडा
SHARES

दिवाळीचा (diwali) सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा (firecrackers) तुटवडा निर्माण झाला आहे.

परिणामी फटाक्यांच्या किमती तब्बल 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे फटाके फोडून दिवाळी साजरी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (mumbai) फटाक्यांच्या होलसेल बाजारात किरकोळ खरेदीदारांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. लहान-मोठे फटाके खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत.

मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटाक्यांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.

दिवाळीच्या पाच ते सहा महिने अगोदर फटाके निर्मितीस प्रारंभ होतो. यंदा फटाके निर्मितीचे केंद्र असलेल्या तमिळनाडूमधील शिव काशी येथे अतिवृष्टी झाली.

त्यामुळे फटाके निर्मितीमध्ये अडचणी आल्या. फटाके सुकण्यासाठी ऊन गरजेचे असते. मात्र यंदा तेथे पावसामुळे फटाके सुकवण्यात अडचण निर्माण झाली.

यामुळे तेथील कारखानदारांनी उत्पादन बंद ठेवले होते. परिणामी देशात फटाक्यांची टंचाई निर्माण झाली असल्याचे, होलसेल विक्रेते राहुल घोणे यांनी सांगितले.

कच्चे साहित्य महाग झाल्यानेही फटाक्यांच्या किमतीमध्ये (prices) सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. यातच फटाक्यांची वात तयार करणाऱ्या नागपूर येथील कंपनीला आग लागली होती.

त्याचा फटाक्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यातच वातेची किंमत 10 टक्क्यांनी वाढल्याचा परिणाम म्हणून फटाक्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

माल कमी आल्याने फटाक्यांच्या किमतीवरही याचा परिणाम झाल्याचे घोणे म्हणाले. दरवर्षी फटाके बाजारात रंगीबेरंगी, विविध आवाज करणारे फटाके येतात.

लहान मुलांना आकर्षक ठरणारे फटाके यंदाही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुलांच्या आवडीच्या ‘पॉप पॉप’ फटाक्याला अधिक मागणी आहे. या फटाक्याच्या किमतीमध्येही वाढ झाली असल्याचेही घोणे यांनी सांगितले.



हेही वाचा

एमएमआरसी आणि सिटीफ्लोचे नवीन बस मार्ग सुरू

बेस्टच्या ताफ्यात फक्त 333 बस शिल्लक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा