Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,79,051
Recovered:
57,33,215
Deaths:
1,18,313
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,637
521
Maharashtra
1,24,398
6,270

ATM कार्ड शिवाय काढता येणार पैसे

एटीएम कार्डशिवाय आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. भारतीय स्टेट बॅंक (State Bank Of India) आणि आयसीआयसीआय (ICICI) बॅंकेने ही नवी सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे.

ATM कार्ड शिवाय काढता येणार पैसे
SHARES

एटीएम कार्डशिवाय आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. भारतीय स्टेट बॅंक (State Bank Of India) आणि आयसीआयसीआय (ICICI) बॅंकेने ही नवी सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे. एसबीआयच्या ग्राहकांना  योनो अॅपच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येणार आहे. यासाठी एटीएम कार्ड (atm card) ची गरज भासणार नाही. तर आयसीआयसीआय बॅंकेनेही विना एटीएमकार्ड पैसे काढण्याची सुविधा सुरु केली आहे. 

एटीएम कार्ड  (atm card) शिवाय पैसे काढण्यासाठी एसबीआय (State Bank Of India)च्या ग्राहकांना आपल्या मोबाइलमध्ये योनो अॅप (Yono app) डाउनलोड करावं लागणार आहे. यामध्ये लॉगइन (Login) करणे आवश्यक आहे.लॉगइन केल्यानंतर योनो अॅपमध्ये 6 डिजीट क्रमांकाचा MPIN सेट करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला योनो कॅशवर क्लिक करून एटीएम सेक्शनमध्ये जाऊन रक्कम टाकावी लागेल. रक्कम टाकल्यानंतर ग्राहकाच्या मोबाइल (mobile) क्रमांकावर एसबीआय योनो कॅश ट्रान्झेक्शन नंबर पाठवेल. हा नंबर एटीएम (atm) मध्ये टाकून ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येतील. पैसे काढताना ग्राहकाला आपल्या एटीएम पासवर्ड माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हा नंबर 4 तासांसाठीच राहणार आहे. एसबीआयच्या एटीएमच्या मुख्यपृष्ठावर ग्राहकाला विना एटीएमकार्ड व्यवहाराचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर योनो कॅश आणि उर्वरित माहिती द्यावी लागणार आहे. यातून फक्त ५०० रूपयापासून 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. 

आयसीआयसी (ICICI) बँकेनेही विना एटीएमकार्ड व्यवहारासाठी आय मोबाइल नावाचे नवे अॅप सुरू केलं आहे. या माध्यमातून आयसीआयसीआयचे ग्राहक १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात. ग्राहकाला  आय मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अ‍ॅपवर लॉग इन करून सेवा आणि आयसीआयसीआय बँक एटीएम (Atm) वर रोख पैसे काढणे हा पर्याय निवडावा लागेल. ग्राहकाने रक्कम टाकल्यानंतर खाते क्रमांक (Account number) निवडून आणि ४ अंकी तात्पुरता पिन तयार करुन सबमिट करावा लागणार आहे. त्यावेळी ग्राहकाला त्वरित एक ओटीपी मिळेल. एटीएमवर कार्डलेस कॅश पैसे काढणे पर्याय निवडून पुढे मोबाइल (mobile) नंबर नमूद करावा लागेल. त्यानंतर ओटीपी क्रमांकावर जाऊन तात्पुरता पिन (pin) नोंदवून हवी असलेली रक्कम (amount) टाकावी लागेल. 

  • एटीएम कार्डशिवाय आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.
  •  भारतीय स्टेट बॅंक (State Bank Of India) आणि आयसीआयसीआय (ICICI) बॅंकेने ही नवी सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे. 

हेही वाचा -

'या' पेन्शन योजनेत वृद्धांना मिळतील दरमहा १० हजार रुपये

पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल

'ह्या' ४ विमा पॉलिसी प्रत्येकाने घ्यायलाच हव्यात
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा