Advertisement

पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल

पॅन कार्ड ( PAN card) आधार कार्डशी (Aadhar card) लिंक (link) केलं नसल्यास पॅन निष्क्रीय (Inactive) होण्याची भिती आता राहणार नाही. गुजरात हायकोर्टा (Gujarat High Court) नं तसा निकालच दिला आहे.

पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल
SHARES

पॅन कार्ड ( PAN card) आधार कार्डशी (Aadhar card) लिंक (link) केलं नसल्यास पॅन निष्क्रीय (Inactive) होण्याची भिती आता राहणार नाही. गुजरात हायकोर्टा (Gujarat High Court) नं तसा निकालच दिला आहे.  पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर  पॅन क्रमांक निष्क्रिय होणार नाही, असा महत्वाचा निर्णय गुजरात हायकोर्टानं दिला आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. 

 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Direct Taxes Board) आधार कार्ड  (Aadhar card) आणि पॅनकार्ड  ( PAN card) लिंक (link) करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. याआधी लिंक करण्यासाठी  ३१ डिसेंबर २०१९ ही शेवटची तारीख होती. जर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल, तर ते पॅन कार्ड निष्क्रिय (Inactive) होईल, असं बोललं जात होतं. पण आता तसं काही होणार नाही. एखाद्या व्यक्तीनं पॅन-आधार लिंक केलं नाही तर त्याला इन्कम टॅक्स रिटर्न (Income tax return) फाइल करण्यापासून किंवा व्यवहार करताना पॅनचा वापर करण्यापासून रोखता येणार नाही, असं गुजरात हायकोर्टानं म्हटलं आहे. 

आधार कायद्याच्या वैधतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर विचाराधीन आहे. त्यामुळे  सुप्रीम कोर्ट (Supreme Court) जोपर्यंत आधार कायद्याच्या वैधतेवर कोणता निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकार ज्या व्यक्तींनी पॅन-आधार लिंक केले नसेल, त्यांचे पॅन कार्ड PAN card) निष्क्रिय करू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला डिफॉल्टर घोषित करू शकत नाही, असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. 

 केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने  (Central Direct Taxes Board) पॅन -आधार लिंकसाठी आठव्यांदा मुदतवाढ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आधार कार्ड (Aadhar card) घटनात्मक वैध असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी पॅन कार्ड PAN card) चे वितरण आणि आयटी रिटर्न (Income tax return) साठी आधारकार्ड बंधनकारक केले होते. त्या आदेशाला अनुसरून सीबीडीटीने नागरिकांना पॅन आणि आधारकार्ड परस्परांना लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत.

असं करा लिंक

तुमचं पॅन कार्ड PAN card) आधारशी लिंक करण्यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज करा. त्यावर UIDPAN लिहून स्पेस द्या. नंतर तुमचा आधार नंबर टाकून स्पेस द्या आणि पॅन कार्ड नंबर टाकून वरील दोन्ही नंबर पैकी एका नंबरवर 'एसएमएस' करा. तसॆच प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला आधार लिंक करता येईल. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. डाव्या हाताला आधार लिंक असा एक पर्याय असेल. त्यावर क्लिक करा. समोर आलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी आपोआप लिंक होईल.



हेही वाचा -

एलआयसीच्या २३ योजना १ फेब्रुवारीपासून बंद

३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बँकांचा संप



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा