Advertisement

'या' पेन्शन योजनेत वृद्धांना मिळतील दरमहा १० हजार रुपये

वृद्धापकाळातील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. या सरकारी योजनेत गुंतवणुकीनंतर दरमहा १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन घेता येते.

'या' पेन्शन योजनेत वृद्धांना मिळतील दरमहा १० हजार रुपये
SHARES

वृद्धापकाळातील आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी (senior citizens) प्रधानमंत्री वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) सुरू केली आहे. या सरकारी योजनेत गुंतवणुकीनंतर दरमहा १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन घेता येते. एलआयसीमार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेत वृद्धांसाठी सरकारने पेन्शन (pension) ची व्यवस्था केली आहे. या योजनेत १० वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. ही योजना ३१ मार्च २०२० पर्यंत चालू राहणार आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेत (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana)६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक गुंतवणूक करु शकतात. योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक (investment) करता येते. योजनेत नागरिकांना १० वर्षांपर्यंत ८ टक्के वार्षिक परतावा देण्याच्या हमीसह पेन्शन दिली जाते. पेन्शन (pension) घेणाऱ्याचेही पर्यायही आहे. ग्राहक मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शन घेऊ शकतात.

अर्ज कसा करावा?

आपण प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये  (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) ऑनलाईन गुंतवणूक देखील करू शकता. यासाठी तुम्हाला एलआयसीची वेबसाइट https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/pmvvymain.do या लिंकवर जावे लागेल. आपण आवश्यक असणारी कागदपत्रे त्याच्या फॉर्मसह कोणत्याही एलआयसी कार्यालयात देखील सबमिट करू शकता.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता ?

  • पॅन कार्ड प्रत

  • निवासी पत्त्याचा पुरावा (आधार, पासपोर्ट इ.)

  • पेन्शनची रक्कम आपल्या खात्यात येऊ शकते. म्हणून धनादेशाची प्रत किंवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत.

किती परतावा मिळेल?

प्रधानमंत्री वय वंदना योजनेत वर्षाला ८-.३० टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतात. पेन्शन आपल्याला मासिक, मासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पाहिजे यावर परतावा अवलंबून आहे.

किती पेन्शन?

या योजनेत किमान १ हजार रुपये व जास्तीत जास्त १० हजार रुपये पेन्शन उपलब्ध आहे. दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर दरमहा १०,००० रुपये पेन्शन मिळविण्यासाठी १५ लाख रुपये जमा करावे लागतील.

योजनेवर कर्ज

या योजनेत गुंतवणुकीस ३ वर्ष पूर्ण झाल्यावर कर्ज घेता येते. कमाल कर्जाची रक्कम खरेदी किंमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत असू शकते. कर्जावरील व्याज दर ठराविक कालावधीने निश्चित केला जाईल. ३० एप्रिल २०१८ पर्यंत योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कर्जाचा व्याज दर वार्षिक १० टक्के होता. कर्जाचे व्याज पेन्शनच्या रकमेतून वजा केले जाते. तथापि, थकीत कर्ज योजनेतून पैसे काढताना वसुल केले जाते.

ठेवीची रक्कम कधी मिळेल?

१० वर्ष मुदतीच्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, पेन्शनच्या अंतिम देयकासह ठेव देखील परत केली जाते. जर १० वर्षांच्या आत गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर ठेवीची रक्कम वारसदाराला दिली जाते.


हेही वाचा -

करबचतीसाठी पोस्ट आॅफिसच्या 'ह्या' ५ योजना

Home Insurance घेणं का आवश्यक? 'हे' आहे कारण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा