Advertisement

करबचतीसाठी पोस्ट आॅफिसच्या 'ह्या' ५ योजना

गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय असू शकेल. पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांना अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते.

करबचतीसाठी पोस्ट आॅफिसच्या 'ह्या' ५ योजना
SHARES

गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय असू शकेल. पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांना अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते. त्यांना लहान बचत योजना असे म्हणतात. या योजनांना शासकीय हमी मिळते. म्हणजे आपले पैसे कधीही बुडणार नाहीत. यापैकी बऱ्याच योजना अशा आहेत की आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत करात सूट मिळू शकते. सरकार दर तीन महिन्यांनी या सर्व योजनांच्या व्याज दराचा आढावा घेते आणि नवीन दर नव्याने ठरवते.


या योजनांमध्ये मिळते कर सवलत


ज्येष्ठ नागरिक बचत योजना 

या योजनेंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ५ वर्षे गुंतवणूक करु शकतात.  किमान १ हजार रुपये आणि जास्तीत जास्त १५ लाख रुपये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवता येतात. या योजनेत ८.६० टक्के व्याज मिळते.

सुकन्या समृद्धि योजना 

या योजनेंतर्गत पालक आपल्या मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाच्या खर्चाचा मोठा भार एकाचवेळी पालकांवर येऊ नये या उद्देशाने केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. फक्त मुलींसाठी असलेल्या या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे. मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्नाची आर्थिक तरतूद करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेत किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये गुंतवता येतात. सुकन्या समृद्धी योजनेत ८.४० टक्के व्याज मिळते. 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

करमुक्त परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ही एक बचत ठेव योजना आहेसरकारने १९६८ मध्ये पीपीएफ योजना सुरू केलीया योजनेत आपण पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो. योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहीत देतेया योजनेत  दरवर्षी किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचा कालावधी १५ वर्षे आहे. त्यात ७.गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय असू शकेल. पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांना अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते.९० टक्के व्याज मिळते. 

५ वर्षांची एनएससी

या योजनेंतर्गत १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही. यामध्ये टीडीएसची कोणतीही तरतूद नाही. या योजनेत व्याज दर ७.९० टक्के आहे.

मुदत ठेव योजना

या योजनेमध्ये आपण एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. किमान गुंतवणूकीची रक्कम २०० रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही. यामध्ये ५ वर्षांच्या ठेवीमध्ये ८०  सी चा लाभ मिळेल. मुदत ठेव योजनांमध्ये ६.९० टक्के ते ७.७० टक्के व्याज मिळते. 



हेही वाचा -

नवीन वर्षात 'ह्या' पर्यायामध्ये करा गुंतवणूक

क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्ड का वापरावे? जाणून घ्या...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा