
बीकेसी, सांताक्रूझ आणि अंधेरी (andheri) परिसरात दररोज नागरिकांना वाहनांच्या रांगा, होणारा उशीर आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो.
मुंबईतील (mumbai) वाहतूक कोंडीचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीए एक नवीन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे.
70 कीमीचा हा भुयारी कॉरिडोर मेट्रो आणि रेल्वेनंतर हे शहरातील तिसरे मोठे प्रवास माध्यम ठरणार आहे.
एमएमआरडीए (mmrda) पुढील काही वर्षांत 70 किलोमीटर लांबीचे भुयारी रस्त्यांचे (Underground Tunnel) नेटवर्क उभारणार आहे. या बोगद्यांमुळे मुंबईतील प्रमुख मार्गांवरील वाहतूक भार मोठ्या प्रमाणात कमी होईल.
हे कॉरिडॉर मेट्रो आणि इतर मार्गांच्या खाली उभारले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च तब्बल 1.05 ट्रिलियन रुपये इतका आहे.
भुयारी कॉरिडॉर मुंबईच्या सागरी किनाऱ्याला, बीकेसी परिसराला आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) जोडणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तर-दक्षिण दिशेतील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.
हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 16 किलोमीटर लांबीचा मार्ग वरळी सी लिंकपासून बीकेसीमार्गे विमानतळापर्यंत उभारला जाईल.
हा टप्पा विमानतळ परिसरातील वाहतूक कमी करेल. दुसऱ्या टप्प्यात 10 किलोमीटर लांबीचा पूर्व-पश्चिम जोडणारा लिंक रोड उभारला जाणार आहे.
तिसरा आणि सर्वात मोठा टप्पा 44 किलोमीटर लांबीच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा असणार आहे. जो संपूर्ण मुंबईत आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील तसेच एस.व्ही. रोडवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे.
