मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरीला

डबे देऊन तो खाली आला, तर सायकल जागेवरून गायब झाली.

मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरीला
SHARES

मुंबईच्या मालाड (पूर्व) येथील खांडवाला लेन परिसरात घडलेल्या एका विचित्र घटनेने डबेवाले वर्गात खळबळ उडवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेमिनाथ इमारतीत दिनेश वायकर नावाचा डबेवाल्याने आपली सायकल गेटबाहेर उभी केली होती. त्या सायकलवर अकरा डबे लटकवलेले होते. डबे देऊन तो खाली आला, तर सायकल जागेवरून गायब झाली.

वायकर यांनी आजूबाजूला चौकशी केली असता कोणालाही काही याबाबत माहिती नसल्यामुळे ते देखील गोंधळून गेले. मात्र आपली सायकल चोरी गेली असल्याचा संशय आल्याने डबेवाल्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून चोरीचा तपास सुरू केला आहे.

डबेवालाच्या सायकल चोरीच्य घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. 'डबेवालेही सुरक्षित नाहीत का आता?' मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना डबेवाल्यांची सायकलही चोरट्यांच्या निशाण्यावर आली आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.



हेही वाचा

रोहित आर्याची चकमक बनावट? याचिकेद्वारे आरोप

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांना नवे आदेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा