Advertisement

आता मित्रांचाही विमा काढता येणार, फ्रेंड इन्शुरन्सला आयआरडीएची मान्यता

आता तुम्हाला आपले जवळचे मित्र (friend) आणि नातेवाईक (Relatives) यांच्यासाठीही विमा पाॅलिसी (Insurance policy) घेता येणार आहे. भारतीय विमा नियंत्रक प्राधिकरणाने (Insurance regulatory authority of india ) अशा पाॅलिसी आणण्यास परवानगी दिली आहे.

आता मित्रांचाही विमा काढता येणार, फ्रेंड इन्शुरन्सला आयआरडीएची मान्यता
SHARES

आता तुम्हाला आपले जवळचे मित्र (friend) आणि नातेवाईक (Relatives) यांच्यासाठीही विमा पाॅलिसी (Insurance policy) घेता येणार आहे. भारतीय विमा नियंत्रक प्राधिकरणाने (Insurance regulatory authority of india - आयआरडीए) अशा पाॅलिसी आणण्यास विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे. अशा पाॅलिसींना विमा नियंत्रक प्राधिकरणाने फ्रेंड इन्शुरन्स (Friend insurance) असं नाव दिलं आहे. या पाॅलिसी घेणाऱ्या समूहांना सवलतही दिली जाणार आहे. 

आयआरडीए (Insurance regulatory authority of india) ने सध्या कंपन्यांना आरोग्य विमा (Health insurance) आणण्यास मान्यता दिली आहे. या पाॅलिसीचा प्रस्ताव रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स (Religare Health Insurance), मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स (Max Bupa Health Insurance) आणि कोटक महिंद्र जनरल इन्शुरन्स (Kotak Mahindra General Insurance) या कंपन्यांनी आयआरडीएसमोर ठेवला होता. या कंपन्या १ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार आहेत. फ्रेंड इन्शुरन्स पाॅलिसीमध्ये ५ ते ३० लोकांचा समावेश करता येऊ शकणार आहे. वर्षभरात समूहापैकी कुणीही विम्याचा दावा केला नसल्यास पुढील प्रीमियम (Premium) मध्ये १५ टक्के सवलत देण्यात येणार असल्याचं रेलिगेअर इन्शुरन्सने साांगितलं आहे. तर मॅक्स बुपाने चांगल्या मूल्यमापनाच्या आधारावर ५ ते १० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.

आतापर्यंत  व्यक्तीला केवळ त्याच्या कुटुंबासाठी (पालक, पत्नी / पती आणि दोन मुले) आरोग्य विमा (Health insurance) पॉलिसी घेता येत होती. परंतु आता मित्र किंवा नातेवाईकांचाही या  फ्रेंड इन्शुरन्स (Friend insurance)  पाॅलिसीमध्ये समावेश करता येणार आहे.  अशा प्रकारची पॉलिसी जर्मनीमध्ये उपलब्ध आहे. आपल्या देशात ही पॉलिसी आणताना त्यात काही बदल करण्यात आले आहेत. असे बदल करताना सुरुवातीला आयआरडीए (Insurance regulatory authority of india) ने काही बंधने घातली होती. केवळ विमा पॉलिसी (Insurance policy) काढायची म्हणून ही गट पॉलिसी काढता येणार नाही, असं आयआरडीएने म्हटले आहे. एका गटासाठी पॉलिसी देताना त्या गटात काहीतरी साम्य असणे गरजेचे आहे, अशी अट आयआरडीएने घातली आहे. 

  • जवळचे मित्र (friend) आणि नातेवाईक (Relatives) यांच्यासाठीही विमा पाॅलिसी (Insurance policy) घेता येणार आहे. 
  •  भारतीय विमा नियंत्रक प्राधिकरणाने (Insurance regulatory authority of india - आयआरडीए) अशा पाॅलिसी आणण्यास विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे. 
  • अशा पाॅलिसींना विमा नियंत्रक प्राधिकरणाने फ्रेंड इन्शुरन्स (Friend insurance) असं नाव दिलं आहे.
  • या पाॅलिसीचा प्रस्ताव रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स (Religare Health Insurance), मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स (Max Bupa Health Insurance) आणि कोटक महिंद्र जनरल इन्शुरन्स (Kotak Mahindra General Insurance) या कंपन्यांनी आयआरडीएसमोर ठेवला होता.

हेही वाचा -

ATM कार्ड शिवाय काढता येणार पैसे

'ह्या' ४ विमा पॉलिसी प्रत्येकाने घ्यायलाच हव्यात

पॅन-आधार लिंक नसल्यास पॅन निष्क्रीय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा