Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

संपामुळे सरकारी बँका सलग ३ दिवस बंद

इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (United Forum of Bank Unions) ने दोन दिवसीय संप (strike) पुकारला आहे.

संपामुळे सरकारी बँका सलग ३ दिवस बंद
SHARES

संपामुळे (strike) सरकारी बँका (Government bank) शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद (Closed) राहणार आहेत. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (३१ जानेवारी) आणि शनिवार (१ फेब्रुवारी) रोजी संप पुकारला आहे. २ फेब्रुवारीला रविवार आहे. त्यामुळे सलग ३ दिवस सरकारी बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. 

इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (United Forum of Bank Unions) ने दोन दिवसीय संप (strike) पुकारला आहे. १ फेब्रुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र बँक कर्मचारी (Bank employee) संपावर ठाम आहेत. 

बँक कर्मचारी संघटनांनी १२.२५ टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी इंडियन बँक असोसिएशन (Indian Bank Association) ने फेटाळून लावली आहे. याशिवाय विशेष भत्ते आणि कायम स्वरूपी पाच दिवसांचा आठवडा या मागण्या सरकारने फेटाळल्या आहेत. त्यामुळे  बँक कर्मचारी संघटनांनी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्चमध्ये आणखी ३ दिवस संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व करणाऱ्या नऊ संघटनांचे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्व करते.

इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे.हेही वाचा-

आता मित्रांचाही विमा काढता येणार, फ्रेंड इन्शुरन्सला आयआरडीएची मान्यता

ATM कार्ड शिवाय काढता येणार पैसे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा