‘या’ बँकांनी कर्जे केली स्वस्त! जाणून घ्या कुणाचे किती दर?

रिझर्व्ह बँकेने घटवलेल्या व्याजदरांचा फायद ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमुख सरकारी बँकेने आपल्या व्याजदरांत घट करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया (SBI), बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), कॅनरा बँक (Canara Bank), आयडीबीआय बँक (IDBI Bank), आंध्र बँक (Andhra Bank) सहीत एचडीएफसी (HDFC) या खासगी बँकेचाही समावेश आहे. या बँकांनी एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेण्डिंग रेट्स) आधारित व्याजदर कमी केले आहेत.

रेपो दर घटले

द्विमासिक पतधोरण आढावा (MPC) बैठकीनंतर रिझर्व्ह बँके (RBI)ने  रेपो दरांमध्ये सलग चौथ्यांदा कपात केली. ‘आरबीआय’ने रेपो (Repo Rate) आणि रिव्हर्स रेपो (Reverse repo rate) दरांमध्ये ०.३५ टक्क्यांची कपात केली. यामुळे रेपो दर  ५.४० टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्क्यांवर आला आहे. 

या व्याजदर कपातीचा फायदा बँकांनी आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा बाजारातील तज्ज्ञांकडून करण्यात येत होती. त्यानुसार स्टेट बँक आॅफ इंडिया या देशातील सर्वात मोठय़ा बँकेने कर्ज व्याजदर ०.१५ टक्क्यांनी कमी करत वार्षिक ८.२५ टक्क्यांवर आणून ठेवले आहेत. स्टेट बँकेने पतधोरणापूर्वीच गृह कर्ज तसेच ठेवींवरील दर ०.०५ टक्क्याने कमी केले होते. तसंच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी समूहातील बँक, वित्त कंपन्यांनी गृह कर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्यापर्यंत कमी केले होते.

‘या’ बँकांनी केली कपात

  • यापाठोपाठ बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे बँकेचा ३ आणि ६ महिने कालावधीचा एमसीएलआर (MCLR) अनुक्रमे ८.३ व ८.४ टक्के झाला आहे.
  • आयडीबीआय बँकेने देखील एमसीएलआरमध्ये .०५ ते .१५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे या बँकेच्या ६ महिने, १ वर्ष व ३ वर्षे मुदतीच्या कर्जांवरील व्याजदर अनुक्रमे ८.५, ८.८५ व ९.१ टक्क्यांनी कमी झाला आहे. 
  • कॅनरा बँकेने सर्व मुदतीच्या कर्जांच्या एमसीएलआरमध्ये .१० टक्क्यांनी कपात केल्याने या बँकेचा १ वर्ष मुदतीचा एमसीएलआर ८.५ टक्के झाला आहे.
  • आंध्र बँकेने १ वर्षांपर्यंतच्या मुदत कर्जांवरील एमसीएलआरमध्ये .२५ टक्क्यांची कपात करत एमसीएलआर ७.९५ टक्क्यांवर आणला आहे.

या ६ बँकांचाही निर्णय

सोबतच, सिंडिकेट बँक, बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, इंडियन बँक, बँक आॅफ बडोदा आणि अलाहाबाद बँक या बँकांनीही कर्जांचे आणि मुदत ठेवीचे दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरांशी सुसंगत राखण्याचा निर्णय घेतला आहे. 


हेही वाचा-

कर्जधारकांना खूशखबर! आरबीआयने केली व्याजदारांत ०.३५ टक्क्यांची कपात

आता NEFT ने २४ तासांत केव्हाही पाठवा पैसे!


पुढील बातमी
इतर बातम्या