Advertisement

कर्जधारकांना खूशखबर! आरबीआयने केली व्याजदारांत ०.३५ टक्क्यांची कपात

आरबीआयने केलेल्या व्याजदर कपातीमुळे रेपो दर अनुक्रमे ५.४० टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे कर्जदारांच्या गृह, वाहन, वैयक्तिक इ. कर्जाचे हप्ते (EMI) कमी होण्यास मदत होणार आहे.

कर्जधारकांना खूशखबर! आरबीआयने केली व्याजदारांत ०.३५ टक्क्यांची कपात
SHARES

रिझर्व्ह बँके (RBI)ने कर्जधारकांना पुन्हा एकदा खूशखबर दिली आहे. बुधवारी सकाळी झालेल्या ‘आरबीआय’च्या द्विमासिक पतधोरण समिती (MPC)च्या बैठकीत रेपो दर (Repo Rate) आणि रिव्हर्स रेपो दरां (Reverse repo rate)मध्ये  ०.३५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. कपातीमुळे रेपो दर अनुक्रमे ५.४० टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे कर्जदारांच्या गृह, वाहन, वैयक्तिक इ. कर्जाचे हप्ते (EMI) कमी होण्यास मदत होणार आहे. 

आर्थिक व्यवहारांना गती

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली ६ सदस्यीय पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत महागाई दर निर्धारीत लक्ष्यापासून दूर असूनही मंदावलेल्या आर्थिक व्यवहारांना गती देण्याच्या दृष्टीकोनातून  रेपो आणि रिव्हर्स रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरकपातीमुळे रेपो रेट ५.७५ टक्क्यांवरून ५.४० टक्क्यांवर आला आहे, तर रिव्हर्स रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.१५ टक्क्यांवर आला आहे. 

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात चारवेळेस व्याजदरांत कपात केली आहे. आकड्यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ०.७५ टक्क्यांची कपात आरबीआयने केली आहे. परंतु आतापर्यंत बँकांनी केवळ ०.३५ टक्के व्याजदरकपातीचा फायदाच शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचवला आहे. यांत आणखी वाढ होऊन कर्जधारकांना कर्जकपातीचा जास्तीत लाभ मिळाला पाहिजे. नवीन खासकरून स्वस्त: घर विकत घेणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होईल.

-शिरीष बैजल, चेअरमन आणि एम.डी. नाईट फ्रँक इंडिया


जर बँकांनी या व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला, तर स्वस्त घरांची मागणी वाढेल. यामुळे कर्ज घेण्यासाठी ग्राहक पुढं येतील. परिणामी घरांच्या विक्रीला हातभार लागेल. आरबीआयने विचर केल्यानुसार अर्थव्यवस्थेला गती देण्यास हा ही व्याजदरकपात अनुकूल ठरेल.

-निरंजन हिरानंदानी, सिनियर व्ही.पी. असोचेम आणि राष्ट्रीय अध्यक्ष नारडेको   

सलग चौथी कपात 

आरबीआयने केलेली ही सलग चौथी दरकपात आहे. या आधी तिन्ही वेळेस प्रत्येकी ०.७५ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. एकूण चार वेळेस झालेल्या दर कपातीमुळे कर्जाच्या आधारभूत अंकां(Basis Points)मध्ये १.१० टक्क्यांची कपात झाली आहे. सद्यस्थितीत मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर (MCLR) ६ टक्क्यांवरून घटून ५.६५ टक्क्यांवर आला आहे. तर सीआरआर (CRR) आणि एसएलआर (SLR) १९.२५ टक्क्यांवर कायम आहे. गरज भासल्यास व्याजदरांत आणखी कपात करण्यात येईल, असंही पतधोरण समितीने स्पष्ट केलं आहे. 

अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उद्देश या व्याजदरकपातीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत रूपया काहीसा कमकुवत असल्याने रूपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने त्वरीत उपाययोजना केल्या पाहिजेत.

- पुष्कर मुकेवार, को फाऊंडर आणि सीईओ ड्रिप कॅपिटल

आरबीआयच्या निर्णयामुळे काही प्रमाणात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत तरलता येण्यास मदत होणार आहे. आता मुख्य लक्ष या व्याजदरकपातीचा लाभ सर्वसामान्य कर्जदारांपर्यंत कसा पोहोचेल, याकडे असायला हवा.

-धीरज रेली, एम.डी. आणि सीईओ, एचडीएफसी सिक्युरिटीज

Dhiraj Relli, MD & CEO, HDFC Securities

जीडीपीच्या अंदाजात बंद

सोबतच आरबीआयने जीडीपीचं नियोजीत लक्ष्य देखील घटवलं आहे. याआधी जीडीपीचा दर ७ टक्क्यांवर ठेवण्याचं लक्ष्य निर्धारीत करण्यात आलं होतं. ते कमी करून आता ६.९ टक्क्यांवर आणण्यात आलं आहे.



हेही वाचा-

शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती

शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा